air-pollution
air-pollution 
देश

विद्यार्थ्यांनी विकसित केले प्रदुषण कमी करण्याचे तंत्र

वृत्तसंस्था

भोपाळ - सध्या हवेच्या प्रदुषणाचा प्रश्न मोठ्या प्रमाणात भेडसावत आहे. परंतु, वाहनांमुळे होणाऱ्या हवा प्रदूषणावर नियंत्रण आणणारे एक उपकरण विकसित करण्यात आले आहे. भोपाळमधील लक्ष्मी नारायण तंत्रज्ञान महाविद्यालयातील विद्यार्थी-शिक्षकांनी हे उपकरण विकसित केले आहे. या उपकरणामुळे दुचाकी आणि चारचाकी वाहनांमुळे होणाऱ्या प्रदूषणावर नियंत्रण आणता येईल असा दावा त्यांनी केला आहे.

वाहनांच्या प्रदूषणामुळे कार्बन डायऑक्साइड आणि इतर विषारी वायू हवेत मिसळले जातात. विद्यार्थ्यांनी 'इलेक्ट्रोस्टॅटीक गॅस प्युरिफायर डीव्हाइस' हे उपकरण बनवले आहे. या उपकरणामुळे वाहनांतून होणाऱ्या प्रदूषणावर नियंत्रण ठेवण्यास मदत होणार आहे. विद्यार्थ्यांनी विकसित केलेल्या या उपकरणामुळे विषारी घटकांवर नियंत्रण ठेवण्यास मदत होणार असल्याचा दावा करण्यात येत आहे. 

महाविद्यालयाचे सहाय्यक प्राध्यापक पुष्कल बदोनिया यांनी सांगितले, गेल्या वर्षभरापासून आमचे यावर संशोधन सुरू होते. यासंदर्भातील आमची दोन संशोधने आंतरराष्ट्रीय जर्नलमध्ये प्रकाशित झाली आहेत. तर, या उपकरणाची पेटंट नोंदणी केली असून, लवकरच वाहनांमध्ये हे उपकरण बसवता येईल अशी माहिती संशोधकांच्या टीममधील जॉसी जॉर्ज यांनी दिली. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

KKR vs DC : दिल्ली पॉईंट टेबलमध्ये मोठी उसळी घेणार की जेक फ्रेसर मॅर्कगर्कला केकेआर रोखणार?

CSK vs SRH IPL 2024 : चेन्नईनं पुन्हा जिंकला चेपॉकचा गड; हैदराबादची इतिहासातील सर्वात मोठी हार

Sambhajinagar : राज्यातील पहिल्या मोसंबी ग्रेडींग व्हॅक्सीन व कोल्ड स्टोरेज केंद्राचे काम पूर्णत्वाकडे

Share Market : शेअर बाजारातील किरकोळ गुंतवणूकदारांच्या संखेत वर्षात ४.०३ कोटींची वाढ; देशात 'हे' राज्य आघाडीवर

Pune Traffic Updates : पुणे विद्यापीठ चौकातील मेट्रोच्या कामानिमित्त वाहतुकीत बदल

SCROLL FOR NEXT