Bihar woman gangraped while taking dip in Ganga; incident taped, circulated on social media
Bihar woman gangraped while taking dip in Ganga; incident taped, circulated on social media 
देश

गंगा नदीत स्नान करताना महिलेवर सामूहिक बलात्कार 

वृत्तसंस्था

पटना : गंगा नदीत स्नान करताना एका 45 वर्षीय महिलेवर सामूहिक बलात्कार करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. तसेच या घटनेचे चित्रिकरणही करण्यात आले. ही घटना दोन दिवसांपूर्वी बिहारमधील पटना येथे घडली. मात्र, याबाबतची माहिती बुधवारी पोलिसांना देण्यात आली. त्यानंतर हा प्रकार समोर आला.

पीडित महिला गंगा नदीत स्नान करत असताना दोन पुरुष त्याठिकाणी आले होते. यातील एकाने पीडितेवर बलात्कार केला तर दुसऱ्या व्यक्तीने चित्रिकरण केला होता. त्यानंतर त्याने व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केले. यातील दोघांना पोलिसांनी अटक केली आहे. या घटनेनंतर पीडित महिलेने याबाबतची तक्रार पोलिस ठाण्यात दिली. त्यानंतर ही घटना उघडकीस आली. या प्रकरणाचा तपास ग्रामीण पोलिस अधीक्षक आनंदकुमार करत आहेत. 

याप्रकरणी शिवपूजन महातो आणि विशाल या दोघांना अटक करण्यात आली आहे. महातो हा एक कारचालक आहे. पीडित महिलेला महातोने नदीतून बाहेर ओढत नेले आणि बलात्कार केला. त्यानंतर दुसऱ्यानेही पीडित महिलेवर बलात्कार केला.

दरम्यान, यातील दोन आरोपींना आम्ही अटक केली असून, शिवपूजन महातो आणि विशाल अशी त्यांची नावे आहेत. या दोघांनी बलात्कार केल्याचा आरोप पीडित महिलेने केला आहे, अशी माहिती पटनाचे वरिष्ठ पोलिस अधीक्षक मनू महाराज यांनी दिली. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bomb Hoax in 16 Schools: मतदानादिवशी 16 शाळांना बॉम्बनं उडवून देण्याची धमकी! रशियातून आला ईमेल ? पोलिसांचं धाबं दणाणलं

Heeramandi The Diamond Bazar : भन्साळींच्या भाचीला नेटकऱ्यांनी केलं ट्रोल; 'या' अभिनेत्रीने ट्रोलर्सला सुनावले खडेबोल

Panchayat 3: प्रमोशनची हटके पद्धत; भाजी मंडईतील दुधीभोपळ्यावर 'पंचायत'चं नाव, व्हिडीओ व्हायरल

Akshaya Tritiya 2024: अक्षय तृतीयेला सोन खरेदीवर विशेष ऑफर! मेकिंग चार्जेसवर ज्वेलरी ब्रँड देत आहेत खास सवलत

Latest Marathi News Update: लोकसभा निवडणुकीत नाशिकमध्ये 31 तर दिंडोरीत 10 उमेदवार रिंगणात

SCROLL FOR NEXT