Kejriwal Modi
Kejriwal Modi  Sakal
देश

Video : भाजपनं केजरीवालांसमोर टेकले हात; थेट घरच्यांनाच केली विनंती

सकाळ डिजिटल टीम

Bjp Attack On Arvind Kejriwal : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि भाजपमधील आरोपप्रत्यारोप हे काही देशाला नवीन नाही. त्यात केजरीवांलांच्या पक्षाने पंजाबमध्ये विजय मिळवला. त्यानंतर आता आपचं लक्ष गुजरात निवडणुकांकडे लागले आहे. केजरीवालांचा विजयी रथ रोखण्यासाठी भाजपकडून ना ना पद्धतींचा अवलंब केला जात आहे. मात्र, त्यात भाजपला यश येताना दिसून येत नाही. त्यामुळेच की काय आता भाजपनं थेट केजरीवालांसमोर हात टेकत त्यांच्या कुटुंबियांना एक विनंती केली आहे.

दिल्लीत गुरुवारी भाजपचे खासदार परवेश साहिब सिंह यांनी पत्रकार परिषदे घेतली. यात त्यांनी केजरीवालांवर जोरदार हल्लाबोल केला. केजरीवाल खुर्चीसाठी एवढे वेडे झाले आहेत की ते मनात येईल ते खोटं बोलत सुटले आहेत. त्यामुळे ते नेमकं काय पाप करताय याचा अंदाज त्यांना नाहीये. दिल्लीतील सामान्य नागरिकांनी केजरीवालांना तीन वेळा मुख्यमंत्रीपद दिले. मात्र, ते नागरिकांना दारू पाजत सुटलेत. यांनी कोविड काळात ऑक्सिजनचा प्रश्न सोडवला नसल्याचीही टीका सिंह यांनी केली आहे.

कुटुंबियांना केली विनंती

दरम्यान, “मला वाटत नाही की, अरविंद केजरीवाल यांना समजावण्याची हिंमत त्यांच्या पक्षात कुणाकडे आहे. त्यामुळे मी श्रीमती अरविंद केजरीवाल, त्यांचे आई-वडील आणि त्यांच्या दोन मुलांना हात जोडून विनंती करतो की, तुमच्याशिवाय या व्यक्तीला कुणीही वाचवू शकत नाही, अशी खोचक विनंती केजरीवालांच्या कुटुंबीयांकडे केली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024, KKR vs DC Live Score: दिल्लीने गमावली नववी विकेट, 150 धावांचा टप्पा गाठणार?

Covid 19 : कोविडची पहिली लस बनवणाऱ्या शास्त्रज्ञावर चीनची मोठी कारवाई; भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे केलं बरखास्त

Govinda Dance: गोविंदानं डान्स करुन केला धैर्यशील मानेंचा प्रचार; व्हिडिओ पाहा

Viral Video: गिल लावत होता फिल्डिंग अन् विराटने अचानक येऊन दिला जोरात धक्का, GT vs RCB सामन्यावेळी काय झालं पाहा

Latest Marathi News Live Update : देशाला हुकुमशाहा सरकारची गरज नाही; उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल

SCROLL FOR NEXT