Mumbai : मंत्रालयाच्या सहाव्या मजल्यावर ED चे कार्यालय? वाचा नेमकं प्रकरण

देशभारातील अनेक प्रकरणांमध्ये ईडीकडून कारवाई केली जात आहे. त्यात काही मंत्री तुरुंगातदेखील आहेत.
Mantralay
MantralaySakal

ED Board In Mantralaya : देशभारातील अनेक प्रकरणांमध्ये ईडीकडून कारवाई केली जात आहे. त्यात काही मंत्री तुरुंगातदेखील आहेत. त्यातच आता मंत्रालयातील सहव्या मजल्यावर ED X असे बोर्ड लावण्यात आले आहेत. यामुळे मंत्रालयातील सहाव्या मजल्यावर ईडीचं कार्यालय आहे अशी चर्चा रंगली आहे. नेमकं काय आहे हे प्रकरण जाणून घेऊया थोडक्यात.

Mantralay
Crime : पुण्यात अंधश्रद्धेचा कळस; सुनेला काळे कपडे घालण्यास विरोध; गुन्हा दाखल

बंडखोरीनंतर सत्तेत आल्यानंतर शिंदे-फडणवीस सरकार एकत्र येत सत्ता स्थापन केली. त्यानंत पार पडलेल्या अधिवेशनात विरोधकांनी सत्तेत आलेले हे सरकार ED चं सरकार असल्याची टीका केली होती. त्यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टीकरणही दिले होते. त्यात ते म्हणाले होते की, होय राज्यात ईडीचं सरकार आहे. त्याबाबत अधिक स्पष्टता देत ते म्हणाले होते की, E म्हणजे एकनाथ तर D म्हणजे देवेंद्र असे आहे.

Mantralay
Hazratganj Accident : घराची भिंत कोसळून दोन मुलांसह 9 ठार

त्यानंतर आता मंत्रालयाच्या सहाव्या मजल्यावर E आणि D असे अक्षरं असलेले बोर्ड लावण्यात आले आहेत. आधी मंत्रालायात आकडेवारीनुसार बोर्ड लावलेले असायचे मात्र, आता पहिल्यांदाच नावाचे पहिले अक्षराचे बोर्ड लावण्यात आले आहे. त्यात एकनाथ शिंदेंसाठी E तर देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी D अशी अक्षरं असलेले बोर्ड लावण्यात आले आहे. त्यामुळे राज्यात ईडी सरकार आणि मंत्रालयात ED चं कार्यालय अशी जोरदार चर्चा सध्या रंगली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com