Suresh prabhu
Suresh prabhu 
देश

भाजपने बदलली रणनीती आणि काँग्रेसचे बदलले सूर!

सकाळ न्यूज नेटवर्क

नवी दिल्ली : राज्यसभेत गदारोळ सुरू असूनही केंद्रीय अर्थसंकल्पावरील चर्चा आज सुरू झाली. सत्तारूढ पक्षाचे पहिले वक्ते सुरेश प्रभू यांच्या भाषणात काँग्रेसने अडथळे आणणे सुरू करताच भाजपने प्रभू यांची जागा बदलून त्यांना तिसऱ्या रांगेतून भाषण करण्याची व्यवस्था केली. यानंतर नवनीत कृष्णन, डॉ. नरेंद्र जाधव व अनिल देसाई यांचीही भाषणे पार पडली. भाजपने रणनीती बदलल्याचे आणि गोंधळात खुद्द पी चिदंबरम यांचेही भाषण वाहून जाण्याची भीती लक्षात येताच काँग्रेसचे सूर बदलले आणि उद्या पासून चर्चा सुरू करण्याची तयारी या पक्षाने दाखवली.

कर्नाटकातील पेच प्रसंगाच्या पार्श्वभूमीवर कामकाज चालू न देण्याचा काँग्रेसचा आग्रह न जुमानता राज्यसभा अध्यक्ष व्यंकय्या नायडू यांनी अर्थसंकल्पावरील चर्चा सुरू केली. चिदंबरम यांनी गोंधळामध्ये बोलण्यास नकार देताच उपसभापती हरिवंश यांनी सरळ प्रभू यांचे नाव पुकारले. पहिल्या रांगेतील प्रभुंनी भाषण सुरू करताच काँग्रेसचे गोंधळी सदस्य थेट त्यांच्यासमोर येऊन घोषणा देऊ लागले व चक्क टाळ्याही वाजवू लागले
प्रभूंच्या मागे असलेल्या केंद्रीय मंत्री स्मृती इराणी आणि अर्थराज्यमंत्री अनुराग ठाकूर यांना हे लक्षात आले. त्याबरोबर त्यांनी प्रभू यांना तिसऱ्या रांगेत बोलण्याची व्यवस्था करून दिली. सदस्यांनी त्यांच्या जागेवरून बोलणेच बंधनकारक व नियमानुसार असते. अन्यथा अधिकृत कामकाजात नोंदवले जात नाही. प्रभू यांची जागा भाजपने बदलल्याचे लक्षात येताच भाकपचे विनय विश्वम यांनी हरकतीचा मुद्दा मांडला मात्र राज्यसभेतील आसन व्यवस्था अजून निश्चित न केल्याचे सांगून उपसभापतींनी तो फेटाळला. यानंतर प्रभूंनी पाऊण तास केलेल्या भाषणात, जागतिक मंदी असूनही सर्वात वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था ही भारताची असल्याबद्दल मोदी सरकारचे अभिनंदन केले. 5 डॉलर अर्थव्यवस्थेचे उद्दिष्ट साध्य करताना प्रत्येक भारतीयाचे उत्पन्नही वाढणार हे स्वाभाविक आहे, असा दावा त्यांनी केला. उत्पादन सेवा योग आधी क्षेत्रांमध्ये भरघोस प्रगतीचा अजेंडा मांडणारा हा अर्थसंकल्प आहे असे त्यांनी सांगितले.

डॉक्टर जाधव यांनी या अर्थसंकल्पाच्या बाबतीत घेतलेले आक्षेप फेटाळताना गुंतवणूक आणि नवोन्मेष यांना चालना देणारा अर्थसंकल्प देशाच्या आजवरच्या उत्कृष्ट अर्थसंकल्पात पैकी एक असल्याचे सांगितले. ही चर्चा उद्याही सुरू राहणार आहे.

गोंधळामुळे राज्यसभेत आजही सलग दुसऱ्या दिवशी प्रश्नोत्तर आणि शून्य प्रहरात चे तास ठप्प झाले. अर्थसंकल्पावरील चर्चा गोंधळात घेण्याचे ठामपणे ठरविल्याने ही चर्चा सुरू होऊ शकली. आपल्या भाषणाच्या शेवटी प्रभू यांनी काँग्रेसचे आभार मानताना 'तुमच्यामुळे मला आज समजले की मी किती जोरात भाषण करू शकतो,' असा टोला लगावला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PM Modi: 'प्रज्वल रेवण्णांचे व्हिडिओ आताचे नाहीत'; पंतप्रधान मोदींनी पहिल्यांदाच केलं थेट भाष्य

Lok Sabha Election 2024 Phase 3 LIVE Updates : तिसऱ्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात.. रितेश-जेनेलिया देशमुखांनी बजावला मतदानाचा हक्क

Election Ink: इतिहास निवडणूक शाईचा; जाणून घ्या कुठे अन् कशी तयार होते मतदारांच्या बोटाला लागणारी शाई

IND vs BAN Women's T20 : चौथ्या ट्वेन्टी-२० सामन्यातही भारताचा बांगलादेशवर विजय

Mumbai News : नरेश गोयल यांना उच्च न्यायालयाचा दिलासा! २ महिन्यांचा मिळाला अंतरिम जामीन

SCROLL FOR NEXT