Prime Minister Narendra Modi And BJP
Prime Minister Narendra Modi And BJP  esakal
देश

BJP Meeting : भाजपच्या निवडणूक समितीची आज बैठक; उमेदवारांच्या नावांची घोषणा होण्याची शक्यता

सकाळ न्यूज नेटवर्क / वृत्तसंस्था

नवी दिल्ली - भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीची बैठक उद्या (ता. २९) दिल्लीत होणार असून यात शंभराहून अधिक उमेदवारांच्या नावांची घोषणा होण्याची शक्यता आहे. या पहिल्या यादीत पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची नावे राहण्याची शक्यता आहे.

आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप पराभूत झालेल्या मतदारसंघांतील उमेदवारांच्या नावावर चर्चा होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या बैठकीत पहिल्या यादीतील उमेदवारांची नावे निश्चित होण्याची शक्यता आहे. गेल्या लोकसभा निवडणुकीत देशात १६० लोकसभा मतदारसंघात भाजपला पराभव पाहावा लागला होता.

या मतदारसंघातील उमेदवारांची नावे प्रामुख्याने पहिल्या यादीत नावे राहणार आहेत. पहिल्याच यादीत पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या नावाचा समावेश राहण्याची शक्यता आहे. मोदी वाराणसी मतदारसंघातून तर शहा हे गांधीनगर मतदारसंघातून उमेदवार राहतील.

मतदान केंद्रांची संख्या वाढवा

महानगरांमध्ये अनेक बहुमजली इमारतींमध्ये मतदार वास्तव्याला राहतात. त्यांना या इमारतींमध्ये किंवा आसपास मतदान केंद्राची सोय करावी, अशी मागणी भाजपतर्फे केंद्रीय निवडणूक आयोगाला करण्यात आली आहे. केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या नेतृत्वात एका शिष्टमंडळाने केंद्रीय निवडणूक आयुक्तांची भेट घेतली. अनेक बहुमजली इमारती एकाच परिसरात राहत असल्याने तेथे मतदारांची संख्या वाढलेली असते. त्यांना त्याच इमारतींमध्ये मतदानाची सोय केल्यास मतदानाच्या संख्येत वाढण्याची शक्यता असल्याचा दावा भाजपच्या शिष्टमंडळाने केला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'शरद पवारांनी भाजपला पाठिंबा दिला होता, ती जर सुपारी होती तर आमचीही..'; आव्हाड, राऊतांच्या टीकेला मनसे आमदाराचं प्रत्युत्तर

Maharashtra Lok Sabha 2024 Phase 5 Election Voting LIVE : Lok Sabha Election 2024 : जाणून घ्या 6 वाजेपर्यंत महाराष्ट्रातील मतदानाची टक्केवारी

Lok Sabha Election 2024 : मतदान केंद्रावरील निवडणूक आयोगाने दिलेल्या सुविधांचा मतदारांना दिलासा

Latest Marathi Live News Update : कंगना रणौत यांच्या रॅलीवर दगडफेक; काँग्रेसविरोधात निवडणूक आयोगाकडे भाजपची तक्रार

Devendra Fadanvis: 'उद्धव ठाकरेंचं रडगाणं सुरू, पराभव समोर दिसू लागल्यानेच त्यांची मोदींवर टीका'; देवेंद्र फडणवीसांचा आरोप

SCROLL FOR NEXT