BJP fielded former IPS officer Devashish Dhar from Virbhum in West Bengal Lok Sabha election 2024  
देश

Lok Sabha : वीरभूममध्ये भाजपचे पुन्हा धक्कातंत्र! ममता बॅनर्जींच्या सरकारने निलंबित केलेल्या IPS अधिकाऱ्याला दिलं तिकीट

Lok Sabha Election 2024 : भाजपने नेहमीप्रमाणे धक्कातंत्राचा वापर करत पश्‍चिम बंगालमधील वीरभूम येथून माजी आयपीएस अधिकारी देवाशीष धर यांना उमेदवारी दिली आहे.

सकाळ वृत्तसेवा

सुरी, ता. १० (पीटीआय) : भाजपने नेहमीप्रमाणे धक्कातंत्राचा वापर करत पश्‍चिम बंगालमधील वीरभूम येथून माजी आयपीएस अधिकारी देवाशीष धर यांना उमेदवारी दिली आहे. धर यांना २०२१मध्ये ममता बॅनर्जी यांच्या सरकारने निलंबित केले होते. धर यांची लढत तृणमूल काँग्रेसच्या नेत्या शताब्दी रॉय यांच्याशी होणार आहे.

वीरभूमचे तृणमूलचे नेते अनुब्रत मंडल यांच्या राजकीय खेळींमुळे आणि वादग्रस्त वक्तव्यांमुळे निवडणुकीदरम्यान वीरभूम मतदारसंघ हा गेल्या काही निवडणुकांमध्ये कायमच चर्चेत राहिला आहे. दरम्यान, गोवंश तस्करीप्रकरणी सीबीआयने २०२२मध्ये मंडल यांना अटक केली असून सध्या ते तिहार तुरुंगात आहेत. मात्र त्यांच्या अनुपस्थितीमध्येही, भाजपने धर यांना उमेदवारी दिल्याने हा मतदारसंघ पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.
भाजपच्या वरिष्ठ नेत्याचा दूरध्वनी

‘‘मला अचानक एका अत्यंत वरिष्ठ नेत्याचा दूरध्वनी आला आणि मला राजकारणात सक्रिय होऊन वीरभूम येथून निवडणूक लढविण्याबाबत विचारणा करण्यात आली. तो नेता इतका वरिष्ठ होता की मी अवघ्या एका तासाच्या आत निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला,’’ असे प्रतिपादन देवाशीष यांनी पीटीआयशी बोलताना सांगितले. मात्र त्यांनी संबंधित नेत्याचे नाव मात्र उघड केलेले नाही. मला भाजपच्या वतीने मोठ्याप्रमाणात संघटनात्मक पाठबळ मिळणार आहे, असेही देवाशीष म्हणाले.

ममता सरकारने केले होते निलंबन


देवाशीष धर हे २०२१मध्ये कुचबिहार जिल्ह्याचे पोलिस अधिक्षक असताना सीताकुचली येथे एका मतदान केंद्रावर झालेल्या हिंसाचारावेळी सुरक्षा दलाच्यावतीने करण्यात आलेल्या गोळीबारात चार नागरिकांचा मृत्यू झाला होता. यानंतर सत्तेत आलेल्या ममता बॅनर्जी यांच्या सरकारने धर यांना निलंबित केले होते. दरम्यान, धर यांनी मार्च महिन्यातच राजीनामा दिला आहे.

मतांवर परिणाम होणार नाही ःरॉय


वीरभूम मतदारसंघातील तृणमूल काँग्रेसच्या नेत्या शताब्दी रॉय यांनी मात्र या मतदार संघातून त्यांचीच निवड होणार असल्याचा दावा केला आहे. ‘‘२०२३मध्ये झालेल्या पंचायत समित्यांच्या निवडणुकांमध्ये अनुब्रत मंडल यांच्या अनुपस्थितीमध्येही पक्षाला चांगली मते मिळाली होती त्यामुळे आम्हाला मंडल यांची उणीव भासत असली तरी आम्हाला येथे विजय मिळणार आहे’’ असे प्रतिपादन रॉय यांनी केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Indian Railways New Menu : रेल्वे मंत्रालयानं जाहीर केलेलं नवं ‘मेन्यू कार्ड’ तुम्ही पाहिलं का?

Latest Maharashtra News Updates : सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणी पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे हायकोर्टाचे आदेश

Who Is Jamie Smith? टीम इंडियाची झोप उडवणारा जेमी स्मिथ कोण? ज्याने केलीय १५० धावांची ऐतिहासिक खेळी, मोडले अनेक विक्रम...

२५ वर्षांनी झी मराठीवर दिसणार लोकप्रिय अभिनेत्री, कधीकाळी ठरलेली गाजलेली नायिका; नव्या मालिकेतून करणार कमबॅक

Eknath Shinde: पुण्यात 'जय गुजरात'ची घोषणा; मुंबईत सारवासारव, अमित शहांसमोर दिलेल्या नाऱ्यावर एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया

SCROLL FOR NEXT