Dhangar Reservation
Dhangar Reservation 
देश

धनगर आरक्षणावरून भाजप खासदारांची शहांसमोर नाराजी

सकाळवृत्तसेवा

नवी दिल्ली : मराठा आरक्षणानंतर धनगर समाजात मोठी नाराजी आहे. मतदारसंघात लोक विचारतात, याचा भाजपचा निवडणुकीत फटका बसेल, अशी भूमिका भाजप खासदारांनी राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्यासमोर मांडली.

आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बुधवारी दिल्लीत झालेल्या महत्त्वपूर्ण बैठकीत महाराष्ट्रातील भाजपच्या खासदारांनी पक्षाध्यक्ष अमित शहा यांच्यापुढे गाऱ्हाणी मांडली. यावेळी बीडच्या खासदार प्रीतम मुंडे यांनी धनगर आरक्षणाबाबत केंद्र सरकारने लवकरात लवकर निर्णय घ्यावा, अशी आग्रही मागणी केली. 2014 मध्ये निवडणुकीत भाजपने धनगर समाजाला आरक्षण देण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, साडेचार वर्ष उलटूनही याबाबत ठोस कार्यवाही होऊ शकलेली नाही. काही दिवसांपूर्वीच राज्य सरकारने मराठा समाजाला सामाजिक व शैक्षणिक मागास प्रवर्गातंर्गत (एसईबीसी) १६ टक्के आरक्षण जाहीर केले होते. तेव्हापासून धनगर आरक्षणाचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

अमित शहा यांच्यासोबत झालेल्या महाराष्ट्रातील खासदारांच्या बैठकीत प्रीतम मुंडे आणि विकास महात्मे यांनी धनगर आरक्षणाचा मुद्दा मांडला. तसेच त्यांनी पक्षाने भूमिका स्पष्ट करावी अशी मागणीही केली. याबरोबरच शिवसेना सोबत आहे का यावर संभ्रम आहे, असे प्रश्नही उपस्थित झाला. यावर शहा यांनी उत्तर दिले की आपण युतीबाबत नेहमीच पुढे आहे. पण, काही जागा गमावून युती होणार नाही. सर्व जागांवर तयारी ठेवावी.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

कोरोना लसीच्या सर्टिफिकेटवरुन PM मोदींचा फोटो काढला! आरोग्य मंत्रालयाने का घेतला निर्णय?

Vishal Patil: "विशाल पाटील भाजपची बी टीम," चंद्रहार पाटलांचा सनसणीत आरोप; प्रचाराच्या अंतिम टप्प्यात सांगलीचा पार चढणार

Johnson Baby Powder: जॉन्सन अँड जॉन्सन कर्करोगाचे खटले निकाली काढणार; कंपनी देणार 6.5 अब्ज डॉलर्सची भरपाई

CSK Playoffs Scenario : CSKवर टांगती तलवार... प्ले-ऑफमध्ये जाण्यासाठी उरला एकच रस्ता; अन्यथा टॉप-4 मधून पत्ता कट

Navi Mumbai Crime: उरण मधील महिलेच्या हत्या प्रकरणात दुसरा आरोपी अटकेत, वय फक्त १९ वर्ष

SCROLL FOR NEXT