Vishal Patil: "विशाल पाटील भाजपची बी टीम," चंद्रहार पाटलांचा सनसणीत आरोप; प्रचाराच्या अंतिम टप्प्यात सांगलीचा पार चढणार

Chandrahar Patil: सांगलीतील सर्वच उमेदवार एकमेकांवर जोरदार टीका करत असल्याने सांगलीची निवडणूक रंगतदार वळणावर पोहचली आहे. त्यामुळे मतदान होईपर्यंत येथे काय काय होतेय ते पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
Vishal Patil Chandrahar Patil
Vishal Patil Chandrahar PatilEsakal

सांगली लोकसभा मतदारसंघातून अपक्ष निडणूक लढवत असलेले काँग्रेसचे बंडखोर विशाल पाटील काँग्रेसची विचारधारा आणि लोकसभा मतदारसंघातील अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी स्वबळावर निवडणूक लढवत असल्याचे म्हणत आहेत.

तर दुसरीकडे महाविकास आघाडीतील शिवसेनेचे उमेदवार चंद्रहार पाटील यांनी विशाल पाटील यांच्यावर सनसनीत आरोप करत ते भाजपची बी टीम असल्याचे म्हटले आहे. (Chandrahar Patil Says Vishal Patil Is B Team Of BJP)

दरम्यान सांगलीतील तिरंगी लढतीत भाजपच्या संजय काका पाटील यांचे चंद्रहार पाटील आणि विशाल पाटील यांना आव्हान असणार आहे. अशात हे सर्वच उमेदवार एकमेकांवर जोरदार टीका करत असल्याने सांगलीची निवडणूक रंगतदार वळणावर पोहचली आहे.

एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलताना शिवसेना (UBT) उमेदवार चंद्रहार पाटील विशाल पाटील यांच्या सांगलीतून अपक्ष म्हणून निवडणूक लढवल्याबद्दल म्हणाले की "विशाल पाटील अपक्ष निवडणूक लढवत असले तरी आम्हाला याचा एक टक्काही तोटा होणार नाही. ते भाजपची 'बी' टीम आहेत आणि भाजपच्या सांगण्यावरून ते अपक्ष म्हणून निवडणूक लढवत आहेत.

Vishal Patil Chandrahar Patil
Sangli Lok Sabha : महायुती भक्कम, 'मविआ'मध्ये फूट; दोन्ही आघाड्यांतील नेत्यांचा आदेश कार्यकर्ते मनापासून पाळणार का?

काँग्रेसचे बंडखोर आणि अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांच्याबाबत बोलताना चंद्रहार पाटील पुढे म्हणाले, "2014 मध्ये त्यांचे भाऊ केंद्रीय मंत्री होते तरीही ते पराभूत झाले. 2019 मध्येही काँग्रेसकडे ही जागा नव्हती. 2014 ते 2024 पर्यंत काँग्रेसचे सांगलीत कुठेही काम नाही मग ते या जागेवर कसा दावा करू शकतात.

Vishal Patil Chandrahar Patil
Shyam Rangeela: मेरे प्यारे देशवासियो... मोदींची मिमिक्री करत प्रसिद्ध झालेल्या कॉमेडियनचे वाराणसीतून पंतप्रधानांना आव्हान

दरम्यान चंद्रहार पाटील यांच्या या आरोपांना उत्तर देताना काँग्रेसचे बंडखोर आणि अपक्ष उमेदवार विशाल पाटील म्हणाले, "मी लोकांचे ऐकतो आणि लोकांनीच मला निवडणूक लढवण्यास सांगितले. मी रिंगणात उतरलो तेव्हा अपक्ष म्हणून निवडणूक लढवणार असे कधीच वाटले नव्हते, काँग्रेसचा उमेदवार म्हणून मी पुढे जात होतो. पण काही घटना घडल्या त्यानंतर मी अपक्ष उमेदवार म्हणून फॉर्म भरला. तसेच सांगलीत काँग्रेसची विचारधारा आणि अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी मी मैदानात उतरलो आहे."

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com