देश

'बुआ-भतिजा'च्या दुकानाला 'अलिगडी कुलूप' : शहा

पीटीआय

अलिगड : लोकसभा निवडणुकीत "बुआ-भतिजा' यांच्या दुकानाला भाजपचे कार्यकर्ते "अलिगडी कुलूप' लावतील, अशी टीका भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांनी आज येथे केली. समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव आणि बहुजन समाज पक्षाच्या सर्वेसर्वा मायावती यांचे नाव न घेता शहा यांनी ही तोफ डागली. 

लोकसभा निवडणुकीसाठी सप-बसप यांची युती झाली असून, शहा यांच्या टीकेचा रोख त्यावर होता. एकेकाळी कुलपांच्या निर्मितीसाठी अलिगड शहर प्रसिद्ध होते. त्याचा आधार घेत शहांनी पक्षाच्या बूथ पातळीवरील कार्यकर्त्यांपुढे बोलताना हा संदर्भ वापरला. सप-बसप युती झाली असताना भाजप उत्तर प्रदेशात 74 जागा कशा मिळवणार, असा प्रश्‍न पत्रकार मला करतात; पण कार्यकर्त्यांची ही गर्दी पाहिल्यावर एवढ्या जागा कशा मिळतील याचे उत्तर मिळेल, असे शहा म्हणाले. 

लोकसभेच्या 2014 च्या निवडणुकीत भाजप आणि त्याचा मित्र पक्ष असलेल्या अपना दल यांनी 80 पैकी 73 जागा मिळविल्या होत्या. यंदा भाजपने आणखी एक जागा जास्त मिळविण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. आगामी निवडणूक पंतप्रधान नरेंद्र मोदी विरुद्ध अन्य पक्ष अशी होईल, असे सांगून शहांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या कामाची प्रशंसा केली.

माफिया गुंडांना योगींनी वेसण घातली असून, "ऊपर मोदी, नीचे योगी' असे सध्याचे चित्र असल्याचे ते म्हणाले. कॉंग्रेस विभाजनाचे राजकारण करत असून, सप-बसप त्याला साथ देत असल्याचा आरोप योगी आदित्यनाथ यांनी केला. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LSG vs MI : मुंबई पॉवर प्लेमध्ये 'पॉवर'लेस; लखनौनं प्ले ऑफचं गणित बिघडवलं?

Modi Latur Rally: "देवानं मला असं मॅन्युफॅक्चर केलंय की..."; PM मोदींनी सांगितलं आपण मोठाच विचार का करतो

Hardik Pandya LSG vs MI : भारतीय संघातील स्थान सेफ होताच हार्दिकचा भोपळा; मुंबईचा संघ आला अडचणीत

Shivam Dube: 'युवराजबरोबर तुलना मुर्खपणाचे...', टी20 वर्ल्ड कपसाठी निवड झालेला शिवम दुबे काय म्हणाला

Loksabha election 2024 : ''जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत मुस्लिमांना एससी, एसटी अन् ओबीसीतून आरक्षण मिळू देणार नाही'' मोदींचा काँग्रेसवर हल्ला

SCROLL FOR NEXT