belgao
belgao 
देश

गणेशोत्सव मंडळांकडून यापुढे बॉण्ड स्वीकारला जाणार नाही : पोलिस आयुक्त

अमृत वेताळ

बेळगाव : शहरातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळा लकडून परवानगीसाठी पोलिस प्रशासनाकडून घेतला जाणारा वीस रुपयांचा बॉण्ड आणि कार्यकर्त्यांचे फोटो घेतले यापुढे घेतले जाणार नाहीत. असे आश्वासन पोलीस आयुक्त डॉ. डी. सी. राजप्पा यांनी शनिवारी (ता. 8) मद्यवर्ती सार्वजनिक गणेशोत्सव महामंडळाच्या पदाधिकाऱ्यांना दिले.

गणेशोत्सव मंडळांना विविध परवाने देताना पोलीस स्थानकातून वीस रुपयांचा बॉण्ड आणि अध्यक्ष सचिवांचे फोटो देण्याची अट घातली होती. त्यामुळे बहुतेक गणेश मंडळानी ही कल्पना सार्वजनिक मध्यवर्ती गणेशोत्सव महामंळाला  दिली होती. त्यानुसार आज महामंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी पोलीस आयुक्त डी. सी. राजप्पा यांची  भेट त्याची कल्पना दिली.

सार्वजनिक गणेशोत्सव महामंडळ मंडळाची जबाबदारी घेत असेल तर ही अट शिथील करू असे म्हणाले. त्यावर तात्काळ महामंडळाने होकार दिला. त्यानंतर पोलीस आयुक्तांनी संबंधित पोलिस स्थानकांच्या अधिकाऱ्यांना सदर अट मागे घेण्याची सूचना केली.

यावेळी महामंडळाचे कार्याध्यक्ष रमाकांत कोंडूसकर, सचिव शिवराज पाटील, उपाध्यक्ष रणजित चव्हाण पाटील, जनसंपर्क प्रमुख विकास कलघटगी, सागर पाटील, गणेश दड्डीकर, शहापूर गणेश महा मंडळाचे अध्यक्ष नेताजी जाधव, अशोक चिंडक, बाळासाहेब काकतकर, राजेंद्र हंडे, शेखर हंडे, अनंत पाटील यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jalgaon Major Accident: भरधाव कारच्या धडकेत मजुरी करण्याऱ्या आईसह दोन चिमुकले ठार!

IPL 2024 DC vs RR Live Score: राजस्थानला तगडा धक्का! आक्रमक खेळणारा कर्णधार सॅमसन झाला बाद, शतकही हुकले

Virtual Touch: बालकांना 'व्हर्च्युअल स्पर्शा'च्या धोक्याची जाणीवही करुन देणं गरजेच - हायकोर्ट

Navneet Rana: "काँग्रेसला मत देणं म्हणजे थेट पाकिस्तानला मत देणं"; नवनीत राणांचं वादग्रस्त विधान

यवतमाळ जिल्हा कारागृहातील धक्कादायक घटना; कारागृहातील अधिकारी, कर्मचाऱ्यावर कैद्यांच्या टोळीचा हल्ला

SCROLL FOR NEXT