Chief Minister K.Chandrasekhar Rao sakal
देश

BRS in Maharashtra : चंद्रशेखर रावांनी विदर्भात पसरले हातपाय, लवकरच नागपूरमध्ये उघडणार पक्ष कार्यालय

तेलंगणाच्या हैदराबाद हाऊसमध्ये मुख्यमंत्री के.चंद्रशेखर राव यांनी शिंदे यांचे पक्षात स्वागत केले.

राजेश नागरे

नागपूर : तेलंगणाचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव आपल्या भारत राष्ट्र समिती या पक्षाच्या विस्तारासाठी लवकरच नागपूरला येणार आहे. नागपूरमध्ये पक्षाचे कार्यालय उघडण्यात येणार असल्याचे त्याचे उद्‍घाटन राव यांच्या हस्ते केले जाणार आहे.

तेलंगणाचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांच्या भारत राष्ट्र समितीने आगामी महापालिकेच्या निवडणुकीची जोरदार तयारी सुरू केली आहे. शनिवारी पक्षाच्या स्थापनादिननिमित्त नागपूरमध्ये पक्ष कार्यालय उघडण्याचा निर्णय घेतला. सोबतच मोठ्या प्रमाणाच इनकमिंग सुरू केले आहे. सोमवारी इंदोरा परिसरात पक्षाचे समन्वयक प्रा. ज्ञानेश वाकुडकर यांच्या उपस्थितीत संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेण्यात आली.

यावेळी संघटनेचा विस्तार आणि निवडणुकीत भागीदार यावर जोर देण्यात आला. तुमसरचे माजी आमदार चरण वाघमारे यांच्या नेतृत्वात विविध पक्षातील कार्यकर्त्यांचा बीआरएसमध्ये प्रवेश केला जात आहे. शिवसेना शिंदे गटाचे माजी विधानसभा संगठक प्रवीण शिंदे यांनी बीआरएसमध्ये प्रवेश केला.

तेलंगणाच्या हैदराबाद हाऊसमध्ये मुख्यमंत्री के.चंद्रशेखर राव यांनी शिंदे यांचे पक्षात स्वागत केले. गौरव जैन, रुपेश ठाकरे, प्रमोद कावळे, शैलेंद्र फुलझेले, अमित बावने, रितेश सायरे, प्रजोत सातकर, सूर्यकांत थूल, चंदन राजभर, निखिल शेंडे, कमलेश साखरे, संजय हाडे, आदित्य तायडे हेसुद्धा पक्षात दाखल झाले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Maharashtra News Updates : यापुढे कुणालाही मारलं तर त्याचे व्हिडीओ काढू नका - राज ठाकरे

Raj Thackeray: निळा मफलर.. डोळ्यांवर गॉगल! राज ठाकरेंच्या 'लूक'मध्ये राजकीय संदेश? अमित ठाकरेही निळ्या शर्टवर

Raj Thackeray: जे बाळासाहेबांना जमलं नाही ते फडणवीसांनी करून दाखवलं, राज ठाकरेंनी सांगितलं एकत्र येण्याचं कारण

मोठी बातमी! राज ठाकरेंना आव्हान देणाऱ्या सुशिल केडियांचं ऑफीस मनसैनिकांनी फोडलं, पाहा VIDEO

Video : "वारी चुकली, पण विठ्ठल भेटला" हॉस्पिटलमध्ये घडली हृदयस्पर्शी घटना; व्हायरल व्हिडीओ पाहून डोळे पाणावतील..

SCROLL FOR NEXT