Shah-Fadanvis
Shah-Fadanvis 
देश

महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळ विस्तारातील नावे 'फायनल'

सकाळ न्यूज नेटवर्क

नवी दिल्ली : दिल्लीच्या धावत्या दौऱ्यावर आलेले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी भाजपाध्यक्ष व केंद्रीय गृहमंत्री अमित शहा तसेच केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांच्या गाठीभेटी घेतल्या. प्रस्तावित मंत्रिमंडळ विस्ताराच्या यादीतील नावे मुख्यमंत्र्यांनी पक्षनेतृत्वाकडून 'फायनल' करून घेतल्याची माहिती मिळते. राज्यातील मंत्रिमंडळ विस्तार विधानसभा अधिवेशनापूर्वी निश्‍चितपणे होणार असल्याचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी सांगितले. पंतप्रधान शेतकरी सन्मान योजनेचा परीघ सरकारने वाढविल्यानंतर राज्यातील वाढीव लाभधारकांची यादी केंद्राला देण्यात येणार आहे.

मुख्यमंत्र्यांसह राज्य भाजपची सुकाणू समिती येत्या नऊ जून रोजी (रविवारी) पुन्हा दिल्लीत येऊन शहा यांच्याशी चर्चा करणार आहे. आजच्या मुख्यमंत्री-शहा बैठकीच्या अजेंड्यावर महाराष्ट्राच्या संदर्भातील दोन-तीन विषय होते. प्रस्तावित मंत्रिमंडळातील भाजप सदस्यांची यादी शहांकडून मंजूर करवून घेणे, दानवे यांना पुन्हा केंद्रात राज्यमंत्री केल्याने नव्या प्रदेशाध्यक्षांची निवड, यावर या बैठकीत चर्चा होणार असल्याची खात्रीलायक माहिती आहे.

राधाकृष्ण विखे पाटील यांना मंत्रिमंडळात स्थान द्यायचे काय, याबाबतही फडणवीस यांनी भाजपाध्यक्षांकडून मार्गदर्शन घेतल्याचे समजते. भाजपच्या कोट्यातून खासदार झालेले विखे यांचे चिरंजीव डॉ. सुजय यांना केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान देण्याबाबतही भाजपने शब्द दिलेला असल्याने पिता-पुत्रांपैकी कोणाला व कोठे खुर्ची द्यायची, असा प्रश्‍न भाजपसमोर आहे. राज्य भाजप सुकाणू समितीची बैठक उद्या (ता. 7) मुंबईत आहे. त्यानंतर ही समिती पुन्हा दिल्लीत येऊन शहा यांच्याशी चर्चा करेल, असे दानवे यांनी सांगितले.

मुख्यमंत्री आज सायंकाळी दिल्लीत आले. त्यांनी पत्रकारांना सांगितले, की "नीट' परीक्षेच्या निकालानंतर वैद्यकीय पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या जागांचा राज्याचा कोटा अनुक्रमे 1700 व 700 जागांपर्यंत वाढवावा, अशी मागणी मी आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांच्याकडे करणार आहे. मराठा आरक्षणासाठी निर्माण केलेल्या "ईडब्ल्यूएस' प्रवर्गानंतर खुल्या प्रवर्गातील वैद्यकीय जागाही घटणार आहेत. त्यामुळे याच वर्षापासून हा वाढीव कोटा राज्याला मिळावा, अशी मागणी करणार असल्याचेही ते म्हणाले. वाढीव जागांइतक्‍या विद्यार्थ्यांना सामावून घेण्याजोग्या पायाभूत सुविधा राज्याकडे असल्याचे त्यांनी नमूद केले. 
 
महेतांचे करायचे काय? 
एमपी मिलप्रकरणी लोकायुक्तांच्या अहवालात ताशेरे ओढण्यात आलेले मंत्री प्रकाश महेता यांच्याबाबत मुख्यमंत्र्यांनी, "गृहीतकांच्या आधारावर बातम्या करणे योग्य नव्हे,' असे सांगितले. महेताप्रकरणी लोकायुक्त अहवाल व या प्रकरणातील कृती अहवाल (एटीआर) सरकार येत्या विधानसभा अधिवेशनात "नीटपणे' मांडेल, असे सांगताना मुख्यमंत्र्यांनी "नीट' शब्दावर दिलेला जोर व त्यांची देहबोली पाहता महेता यांची खुर्ची या वेळी वाचणे कठीण असल्याची चिन्हे दिसत आहेत. आतापावेतो महेता यांचे पद दिल्लीच्या आशीर्वादाने वाचलेले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sangli Lok Sabha: "विशाल पाटलांवर शिवसेनेचा अन्याय"; भाजपचे केंद्रीय मंत्री काय बोलून गेले...

Raghuram Rajan: संपत्ती वितरणावर रघुराम राजन यांचे वक्तव्य चर्चेत; म्हणाले, ''श्रीमंतांवर कर...''

KKR vs DC : कोलकत्याच्या मार्गात दिल्लीचा अडथळा! सुनील नारायणचा पुन्हा दिसणार ‘वन मॅन शो’.... की जेक फ्रेसर मॅर्कगर्क घालणार तांडव

Latest Marathi News Live Update: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आज सोलापुरात सभा

दहा मिनिटांमध्ये लिहिलेल्या मंगलाष्टका अन् मोहन जोशींचा किस्सा; 'असा' शूट झाला होता राधा-घनाच्या लग्नाचा एपिसोड

SCROLL FOR NEXT