Central Government
Central Government Sakal
देश

बारावी परीक्षांबाबत केंद्र सरकार दोन दिवसांत घेणार निर्णय

सकाळ वृत्तसेवा

नवी दिल्ली - केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ (सीबीएसई) (CBSE) व ‘कौन्सिल फॉर दि इंडियन स्कूल सर्टिफिकेट एक्झामिनेशन’ (सीआयएसएसए) (CISSA) यांच्या प्रस्तावित इयत्ता बारावीच्या परीक्षांबाबत (HSC Exam) येत्या दोन दिवसांत अंतिम निर्णय (Decision) जाहीर होणार आहे. खुद्द सरकारकडूनच (Government) आज न्यायालयास ही माहिती देण्यात आली. (Central Government will take a Decision on the HSC Exam in Two Days)

पूर्ण परीक्षाच रद्द करण्याऐवजी अर्ध्या किंवा दीड तासाची परीक्षा घ्यावी याबाबत केंद्र सरकार गांभीर्याने विचार करत आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे या परीक्षा रद्द कराव्यात अशी मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल झाली होती. त्यावर आज सुनावणी पार पडली.

‘मागील वर्षी बोर्ड परीक्षांचे अनेक पेपर घेण्यात आले होते. मात्र मागच्या वर्षीपेक्षा काही वेगळा निर्णय सरकार यंदा घेत असेल तर त्याचे ठोस कारण तुमच्याकडे हवे.’ असे न्यायालयाने अॅटर्नी जनरल के . के वेणुगोपाल यांना बजावले. ‘बोर्डाच्या परीक्षांबाबत दोन दिवसांत म्हणजे येत्या गुरुवारपर्यंत अंतिम निर्णय घेऊ’ असे न्यायालयाला सांगून सरकारने वेणुगोपाल यांनी ही कालमर्यादा बंधनकारक करून घेतली. केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल निशंक हे शक्यतो उद्याच (१ जून) याबाबत घोषणा करतील असे मानले जाते. न्यायालयाने मागील वर्षीपेक्षा या वर्षी संसर्गाची स्थिती गंभीर असल्याचे सांगत गुरुवारपर्यंत सुनावणी स्थगित ठेवली. न्यायालयाच्या निकाला आधीच केंद्र सरकार निर्णय घेईल, कारण केंद्राचा निर्णय जवळपास झाला आहे, असे सूत्रांनी सांगितले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Avinash Bhosale: पुण्यातील उद्योजक अविनाश भोसलेंना दिलासा! अखेर जामीन मंजूर

Gujarat News : 'तिला' डॉक्टर व्हायचं होतं, बोर्डाच्या परीक्षेत ९९ टक्के मिळाले; पण दुर्दैव...

EPFO Latest News : PF अकाउंटमधून तीन दिवसात मिळणार एक लाख रुपये, करा फक्त 'हे' काम

Share Market Closing: शेअर बाजार तेजीसह बंद; सेन्सेक्स 73,917 आणि निफ्टी 22,465 अंकांवर, कोणते शेअर्स वधारले?

Yed Lagla Premach: 'येड लागलं प्रेमाचं' मालिकेत 'या' अभिनेत्याची एन्ट्री; दिसणार इन्सपेक्टर जय घोरपडेच्या भूमिकेत

SCROLL FOR NEXT