Chances of getting relief from the heat are low Chances of getting relief from the heat are low
देश

Weather updates : उष्णतेपासून आराम मिळण्याची शक्यता कमीच; आयएमडीचा इशारा

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली : या आठवड्यात उकाड्यामुळे नागरिक हैराण झाले आहेत. सोमवारी झालेल्या पावसामुळे दोन दिवस नागरिकांना उकाड्यापासून (heat) दिलासा मिळाला. मात्र, मंगळवारी दुपारपासूनच उन्हाने नागरिकांची अवस्था दयनीय केली. अशा स्थितीत पुढच्या आठवड्यात दिलासा मिळेल, अशी अपेक्षा लोकांना होती. मात्र, पुढील आठवड्यातही उष्णतेच्या लाटेपासून दिलासा मिळण्याची शक्यता नाही. आयएमडीने (IMD) या संदर्भात चेतावणी जारी केली आहे. जी विशेषतः पश्चिम आणि पूर्व मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि किनारी आंध्र प्रदेश आणि बनमसह काही भागांसाठी आहे. (Chances of getting relief from the heat are low)

दिल्लीत शनिवारी (ता. ४) सकाळी किमान तापमान २८.७ अंश सेल्सिअस नोंदवले गेले. जे सामान्यापेक्षा एक अंश सेल्सिअस जास्त आहे. आयएमडीने (IMD) काही भागांत उष्णतेच्या (heat) लाटेचा ‘यलो अलर्ट’ इशारा जारी केला होता. कमाल तापमान ४४ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचण्याची शक्यता वर्तवण्यात आली होती. शुक्रवारी कमाल तापमान ४२.९ अंश सेल्सिअस नोंदवले गेले.

हवामान चेतावणी देण्यासाठी आयएमडी (IMD) चार रंग-आधारित अलर्ट कोड वापरते. हिरवा (कोणत्याही कारवाईची आवश्यकता नाही), पिवळा (लक्ष ठेवा आणि अपडेट रहा), केशरी (तयार राहा) आणि लाल (कृती) यांचा समावेश आहे. जेव्हा कमाल तापमान ४० अंश सेल्सिअसपेक्षा जास्त आणि किमान ४.५ अंशापेक्षा जास्त असते तेव्हा उष्णतेची लाट घोषित केली जाते.

उष्णतेची लाट येण्याची शक्यता

राजस्थान, मध्य प्रदेश, दक्षिण उत्तर प्रदेश आणि दिल्ली-एनसीआरमध्ये पुन्हा एकदा उष्णतेची (heat) लाट येण्याची शक्यता (warning) आहे, असे स्कायमेट वेदरचे उपाध्यक्ष (हवामान बदल आणि हवामानशास्त्र) महेश पलावत म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nepal Flood Indian Missing : नेपाळमध्ये शेकडो भारतीय पर्यटक बेपत्ता, महाराष्ट्र सरकारकडून हेल्पलाइन सुरू, असा करा संपर्क

Gokul Election 2026 : 'गोकुळ'च्या सत्ताकारणाचा काउंटडाऊन सुरू! अंतिम मतदार यादीची तारीख ठरली; उमेदवारी अर्जाचा मुहूर्तही निश्चित, 410 संस्थांच्या हरकतीवर सुनावणी

Pune News: आदिवासी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाची झिरवळांकडून थट्टा? ‘खाऊन-पिऊन आंदोलन करा’ म्हणताच विद्यार्थ्यांनी सुनावलं

Hydrogen Train: जगातील सर्वांत शक्तिशाली हायड्रोजन रेल्वेचा नवा विक्रम; भारताच्या पहिल्या ट्रेनने ६ हजार किमी प्रवास पूर्ण

Marathi News Live Updates : कात्रज घाटात भाजपशी संबंधित निवडणूक साहित्याचा खच; स्वच्छता ग्रुपकडून कारवाईची मागणी

SCROLL FOR NEXT