charanjit-singh-channi
charanjit-singh-channi 
देश

हायव्होलटेज ड्राम्यानंतर चरणजीत सिंग चन्नी पंजाबचे नवे मुख्यमंत्री

Amit Ujagare (अमित उजागरे)

नवी दिल्ली : कॅप्टन अमरिंदर सिंग यांच्या राजीनाम्यानंतर पंजाबचे नवे मुख्यमंत्री कोण होणार? याकडे सर्वांचं लक्ष होतं. यासाठी सुरुवातीला अंबिका सोनी आणि सुखजिंदरसिंग रांधवा यांच्या नावाची चर्चा होती. त्यातच सोनी यांनी मुख्यमंत्रीपदासाठी नकार दिल्यानंतर रांधवा यांचे नाव जवळपास निश्चितच मानले जात होते. पण अखेर चरणजीतसिंग चन्नी यांच्या नावावर पंजाबचे नवे मुख्यमंत्री म्हणून शिक्कामोर्तब झाले. तर रांधवा यांची विधीमंडळ नेतेपदी निवड करण्यात आली.

ऑल इंडिया काँग्रेस कमिटीनं (AICC) सुरुवातीला सुखजिंदर सिंग रांधवा यांचं नाव मुख्यमंत्रीपदासाठी सुचवलं होतं. त्यामुळे रांधवा हेच नवे मुख्यमंत्री होणार हे जवळपास निश्चित झालं होतं. पण तरीही याबाबत काँग्रेस हायकमांडची बैठक सुरुच होती. दरम्यान, रांधवा यांनी राज्यपालांकडेही भेटीची वेळ मागितली होती. त्यानुसार ते राज्यपालांच्या भेटीसाठी राजभवनावर रवाना झाले. त्यामुळे रांधवा यांच्या नावाचीच काही वेळात मुख्यमंत्रीपदासाठी घोषणा होईल, असं वाटतं होतं. पण काँग्रेस हायकमांडच्या बैठकीत चरणजीत सिंग चन्नी यांच्या नावावार शिक्कामोर्तब झालं. त्यानंतर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि उत्तराखंडचे माजी मुख्यंत्री हरीश रावत यांनी ट्विट करुन चरणजीत सिंग चन्नी पंजाबचे नवे मुख्यमंत्री असतील अशी घोषणा केली. तसेच रांधवा यांची विधीमंडळ नेते पदी निवड झाल्याचंही सांगितलं.

काँग्रेस हायकमांडच्या या निर्णयानंतर सुखजिंदर सिंग रांधवा यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, "हायकमांडचा जो निर्णय आहे त्याचे मी स्वागत करतो. चन्नी हे माझ्या छोट्या भावासारखे आहेत. हायकमांडच्या निर्णयामुळं मी निराश झालेलो नाही"

दरम्यान, रांधवा यांचे जवळचे सहकारी मानले जाणारे नवज्योत सिंग सिद्धू यांचंही नाव मुख्यमंत्रीपदासाठी चर्चेत होतं. सिद्धू यांच्या नावाची मुख्यमंत्रीपदासाठी चर्चा सुरु झाल्यानंतर माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी त्यांच्यावर गंभीर आरोप केले होते. सिद्धूंच्या नावाला आपला विरोध राहिल कारण ते पाकिस्तानच्या लष्करप्रमुखांचे आणि पंतप्रधानांचे मित्र असल्याचं त्यांनी म्हटलं होतं.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sharad Pawar: शरद पवारांच्या ताफ्यातील गाड्या एकमेकांना धडकल्या, मोठा अनर्थ टळला!

T20 World Cup 2024: ICC ची मोठी घोषणा! वर्ल्ड कपसाठी अंपायर अन् मॅच रेफ्रींची झाली निवड, पाहा संपूर्ण यादी

Arvind Kejriwal: "....म्हणून आम्ही केजरीवालांच्या जामिनाचा विचार करु शकतो"; सुप्रीम कोर्टाचा ईडीला इशारा

Sobita Dhulipala :"हो मी प्रेमात आहे" ; शोबिताने दिली नागा चैतन्यवरील प्रेमाची कबुली ?

OpenAI लाँच करणार गुगलला टक्कर देणारं सर्च इंजिन! जाणून घ्या काय असेल खास?

SCROLL FOR NEXT