comment on social media causes heart attack This is not journalism Sanjeev Balyan delhi
comment on social media causes heart attack This is not journalism Sanjeev Balyan delhi sakal
देश

'ही पत्रकारिता नव्हे...!‘ केंद्रीय मंत्री संजीव बालियान

मंगेश वैशंपायन

नवी दिल्ली - टीव्ही वाहिन्यांवर एकच गोष्ट ओरडून १०-१० वेळा सांगतात पण ती बातमी काय, हे अखेरपर्यंत कळतच नाही. ही काही पत्रकारिता नव्हे, अशा शब्दांत केंद्रीय मंत्री संजीव बालियान यांनी आज कान टोचले. सोशल मिडीयावरच्या टिप्पणी म्हणजेच ‘कॉमेंट' कोणी खरेच गंभीरपणे वाचू लागले तर त्याला ह्रुदयविकाराचा झटकच येईल व नाजूक व्यक्ती महिनाभरात देवाघरीच जाईल इतके भयंकर त्यावर प्रसिध्द होते, असाही हल्लाबोल त्यांनी केला.

इंद्रप्रस्थ संवाद केंद्राच्या वतीने झालेल्या नारद पत्रकारिता पुरस्कार कार्यक्रमात बोलताना बालियान यांनी, वृत्तवाहिन्यांच्या पत्रकारितेच्या नवीन रूपावर चौफेर भाष्य केले. माजी खासदार बलवीर पुंज यांच्यासह देशभरातील १२ पत्रकारांना पुरस्कार देण्यात आले. आनंद नरसिंहन प्रमुख पाहुणे होते. सर्वश्री सच्चिदानंद जोशी, के सुरेश, प्रफुल्ल केतकर, सर्जना शर्मा आदींनी पुरस्कार विजेत्यांची निवड केली. टीव्ही पत्रकार

आपण वृत्तपत्रीय पत्रकारितेचे चाहते आहोत व ग्रामीण भागात आजही वृत्तपत्रांचाच मोठा प्रभाव आहे असे सांगताना ते म्हणाले की पत्रकारिता हे दुधादरी शस्त्र आहे ते जपून वापरायला पाहिजे. अलीकडे वृत्तवाहिन्या व सोशल मिडीयावर ते पाळले जात नाही. नारद हे जगातील पहिले पत्रकार होते हेही आपल्याला या कार्यक्रमाचे निमंत्रण आल्यावरच समजले. आज सोशल मिडीयाचा काही नेमच राहिलेला नाही. एका बंद खोलीत बसून केलेले ट्विट ‘ट्रेन्ड' करू लागले की काय चमत्कार होतो हे आपल्याला आजही समजलेले नाही.

संघाचे प्रचार प्रमुख सुनील आंबेकर यांनी सांगितले की पत्रकारितेने जबाबदारीचे भान पाळलेच पाहिजे असे सांगितले. ते म्हणाले की लोकजागृतीज्वारे लोकशाही मजबूत करण्यासाठी पत्रकारितेतील मोठ्या पदांवरील लोकांची जबाबदारी जास्त मोठी आहे. स्वातंत्र्य आंदोलनात योगदान देणाऱयांचा सन्मान व्हायला हवा व अमृतमहोत्सवी वर्षात देश ज्या नेतृत्वाखाली प्रगती करत आहे त्यांच्याही योगदानाची दखल घेणे उचित ठरेल. त्यांनी पत्रकारितेला लोकजागृतीचे माध्यम मानले. मुळात आज भारत ही संकल्पना समजून घेण्याची आज खरी गरज आहे. जेव्हा नकारात्मक बातम्या पान १ वर प्रसिध्द होतात तेव्हा, समाजात सकारात्मकता व चांगले काही बाकी आहे, उर्वरीत समाज चांगल्या मार्गाने चालला आहे, यावर आपला विश्वास बसतो.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PM Modi: 'प्रज्वल रेवण्णांचे व्हिडिओ आताचे नाहीत'; पंतप्रधान मोदींनी पहिल्यांदाच केलं थेट भाष्य

Lok Sabha Election 2024 Phase 3 LIVE Updates : सकाळी नऊ वाजेपर्यंतची मतदानाची आकडेवारी समोर; महाराष्ट्रात सर्वात कमी मतदान

Share Market Today: शेअर बाजारात आजही घसरण होणार का? काय आहे तज्ज्ञांचा अंदाज

Sabudana Paratha Recipe : नाश्त्याला झटपट बनवा चविष्ट साबुदाणा पराठा, पोषणासोबतच मिळेल भरपूर ऊर्जा, वाचा सोपी रेसिपी

Election Ink: इतिहास निवडणूक शाईचा; जाणून घ्या कुठे अन् कशी तयार होते मतदारांच्या बोटाला लागणारी शाई

SCROLL FOR NEXT