goa
goa 
देश

वीजमंत्र्यांविरुद्ध बेहिशी मालमत्तेची गोवा लोकायुक्तकडे तक्रार दाखल 

विलास महाडिक

पणजी (गोवा) : जुने गोवा येथील प्रसिद्ध बासिलिका ऑफ बॉम जेसुस या चर्चच्या मागील बाजूला वीजमंत्री पांडुरंग मडकईकर यांनी कोट्यवधींचा अलिशान बंगला बांधला असल्याने त्यांच्या बेहिशेबी मालमत्तेची चौकशी करण्याची तक्रार ऍड. आयरिश रॉड्रिग्ज यांनी गोवा लोकायुक्तकडे केली आहे. दक्षता खात्याच्या भ्रष्टाचार प्रतिबंधक विभागामार्फत सुरू असलेल्या या 
प्रकरणाच्या तपासाची माहिती मागवावी असे तक्रारदारने विनंती केली आहे. 

वीजमंत्री पांडुरंग मडकईकर यांच्या निकिताशा रिअल्टर्स प्रा. लि. कंपनीतर्फे हा अलिशान बंगला सर्वे क्रमांक 144/2 मध्ये बांधण्यात आला आहे. या तक्रारीसोबत ऍड. रॉड्रिग्ज यांनी बंगल्याची छायाचित्रे तसेच मागील विधानसभा निवडणुकीवेळी त्यांनी उमेदवारी अर्जासोबत सादर केलेल्या प्रतिज्ञापत्राची प्रत जोडली आहे. 

या प्रतिज्ञापत्रामध्ये वीजमंत्री पांडुरंग मडकईकर यांनी स्वतःसह कुटुंबियांच्या नावावर असलेली मालमत्ता व असलेल्या कर्जाची माहिती दिली होती. त्यांनी 2015 - 16 या आर्थिक वर्षात केलेल्या आयकर भरण्यामध्ये स्वतःचे उत्पन्न 1.44 लाख व पत्नी जनिता हिचे उत्पन्न 24 हाजर 389 दाखविले होते. इतर मालमत्तेमध्ये मडकईकर यांनी 10 लाखांचे वैयक्तिक कर्ज समर्थ मोटर्सचे मालक महसूलमंत्री रोहन खंवटे व 5 लाख रुपये कर्ज भाऊ धाकू मडकईर याच्याकडून घेतल्याचे दाखविले आहे. तर त्यांची पत्नी जनिता यानी 10 लाख कर्ज राजेश खंवटे यांच्याकडून तर वैयक्तिक कर्ज 6.24 लाख रु. पतीकडून घेतल्याचे दाखविले आहे. 

मडकईकर पती - पत्नीने घोषित केलेल्या मालमत्ता व उत्पादनाच्या स्रोतापेक्षा बांधण्यात आलेल्या बंगल्याचा खर्च कितीतरी पटीने आहे. निवडणुकीवेळी त्यांनी ते पूर्वी राहत असलेल्या मालमत्तेची माहिती दिली होती व त्याची किंमत सुमारे 69.68 लाख असल्याचे घोषित केली होती मात्र या नव्या बंगल्यासंदर्भातची माहिती उघड केली नव्हती. त्यामुळे ही मालमत्ता बेहिशेबी असल्याचा दावा तक्रारदारने केला आहे. 

या बेहिशेबी मालमत्तेसंदर्भात वीजमंत्री मडकईकर यांच्याविरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल करून एक महिना उलटला तरी अजून काहीच चौकशी सुरू झाली नाही. मडकईकर हे मंत्री असल्याने हा विभाग चौकशीबाबत चालढकलपणा करत आहे. मडकईकर यांनी कथित भ्रष्टाचाराच्या मार्गाने हा अलिशान बंगला उभारला असल्याचे उघडकीस येते त्यामुळे या विभागाने आतापर्यंत कोणता तपास केला याचा अहवाल गोवा लोकायुक्तने मागवून घ्यावा अशी विनंती ऍड. रॉड्रिग्ज यांनी केली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Water Scarcity : पिण्याच्या पाण्यासाठी दाहीदिशा वणवण ; राज्यात भीषण टंचाई,७४९५ वस्त्यांवर टँकरद्वारे पुरवठा

Daily Rashi Bhavishya : आजचे राशिभविष्य - 30 एप्रिल 2024

Narendra Modi in Pune : रेसकोर्सवर अवतरला ‘केसरिया सागर’

Nashik Ashok Kataria Fraud Case: अशोक कटारिया यांचा ‘अटकपूर्व’ फेटाळला! अडचणीत वाढ; हायकोर्टात जाण्याची शक्यता

IPL 2024, KKR vs DC: कोलकातानं मागच्या सामन्यातून धडा घेतला अन् पंतच्या दिल्लीला चारीमुंड्या चीत केलं

SCROLL FOR NEXT