Congress BJP expect bypoll for 27 seats in Madhya Pradesh by early October 
देश

आकड्यांचा खेळ! मध्यप्रदेशात कमलनाथ देणार भाजपला मोठा झटका?

सकाळ डिजिटल टीम

भोपाळ : मध्यप्रदेशातील राजकीय वातावरण आणखी गरम होण्याची शक्यता आहे. सर्व काही आकड्यांचा खेळ पाहिल्यास कमलनाथ मध्यप्रदेशातील भारतीय जनता पक्षाच्या सरकारला मोठा झटका देऊ शकतात. मध्य प्रदेशात (MP)विधानसभेच्या २७ जागा रिक्त आहेत. त्या २७ जागांवर आता पोटनिवडणूक होणार आहे. पोटनिवडणुकीच्या तारखाही लवकरच जाहीर होतील. लवकरच निवडणूक आयोग त्या जाहीर करण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

भारतीय जनता पक्ष (BJP) आणि कांग्रेस (Congress) साठी ही पोटनिवडणूक अत्यंत महत्वाची आहे. कारण, या २७ जागांच्या निकालांवर मध्यप्रदेशच्या सत्तेत कोण राहणार याचा निर्णय होणार आहे. या २७ जागांच्या जीवावर पुन्हा सरकार पलटी होण्याची शक्यता मध्यप्रदेशात निर्माण झाली आहे. भाजपला सत्तेत राहण्यासाठी २७ पैकी ९ जागांवर विजय मिळवणे आवश्यक आहे. यापेक्षा कमी जागा मिळाल्यास त्यांची सत्ता जाऊ शकते. काँग्रेससाठी ही निवडणुक मोठे आव्हान घेऊन आली आहे. माजी मुख्यमंत्री कमलनाथ (Kamal Nath) यांच्यासाठी ही पोटनिवडणुक खास आव्हानात्मक आहे. कमलनाथ यांना स्पष्ट बहुमत मिळवायचे असल्यास सर्व २७ जागांवर विजय मिळवणे आवश्यक आहे.

राज्यात एकूण २३० विधामसभेच्या जागा आहेत. त्यापैकी २७ जागा रिक्त असून उर्वरित २०३ विधानसभा सदस्य असलेल्या विधानसभेत भाजप सत्तेत आहे. सध्याच्या आकडेवारींनुसार भाजपकडे १०७ सदस्य असून बहुमतापेक्षा जास्तीच्या ५ सदस्यांचा त्यांना पाठिंबा आहे. तर, या विधानसभेत काँग्रेसकडे ८९ सदस्य आहेत. पोटनिवडणुक झाल्यास काँग्रेसला बहुमत सिद्ध करायचे झाल्यास एकूण ११६ सदस्यांचा पाठिंबा मिळवणे आवश्यक आहे. त्यासाठी त्यांना सर्व २७ जागांवर विजय मिळवावा लागेल. परंतु, पोटनिवडणुकीनंतर भाजप स्पष्ट बहुमतांपर्यंत पोहोचली नाही. तर, काँग्रेस पुन्हा समाजवादी पार्टी (SP), बहुजन समाज पार्टी (BSP) आणि अपक्ष उमेदवारांच्या सहाय्याने राज्यात सरकार स्थापन करू शकते.

पोटनिवडणुकीत जर काँग्रेसला २० आणि भारतीय जनता पक्षाला ०७ जागांवर विजय मिळवता आला तर कमलनाथ चार अपक्ष आमदार बसपचे दोन आणि सपच्या एका आमदाराच्या जीवावर पुन्हा सत्ता स्थापन करु शकतात. माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांनी सांगितले आहे की, ही पोटनिवडणूक मध्यप्रदेशच्या भविष्यासाठी अत्यंत महत्वाची आहे. मागील चार महिन्यांपासून मी पक्ष मजबूत करण्यावर लक्ष दिले आहे. त्यामुळे या निवडणुकीत सर्वच जागांवर विजय मिळवण्यावर आमचा कल असेल असेही त्यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime: पुण्यात सैराटपेक्षाची भयानक घटना! प्रेमविवाह केल्याचा मनात राग, तिघांनी सलूनचं सेटर लावलं अन् तरुणावर कोयत्याने वार

Pune News: अमली पदार्थ विरोधी पथकाची माेठी कारवाई! 'कोंढवा, बिबवेवाडीतून २७ लाखांची अफू', मेफेड्रोन जप्त; दोघांना अटक

Dhule News: जोडपं गाढ झोपेत असतानाच नियतीनं डाव साधला, सुखी संसार अर्ध्यावरच संपला; धुळ्यातील दुर्दैवी घटना

DY Chandrachud: माजी CJI चंद्रचूड अजूनही सरकारी बंगल्यातच, सर्वोच्च न्यायालयाचे केंद्र सरकारला पत्र, मोठं कारण आलं समोर

परिवहन मंत्र्यांचे आदेश! 'शालेय विद्यार्थ्यांसाठी एसटीच्या फेऱ्या रद्द करू नयेत'; सव्वापाच लाख प्रवासाचे पास वाटप

SCROLL FOR NEXT