Bhimashankar Temple : सर्वांसाठी नियम वेगळे; भाजप नेत्यासाठी वेगळे? भाविकांना अडवले, खासदाराला प्रवेश; भीमाशंकर मंदिरात वाद

Bhimashankar Temple Opened for BJP MP Nishikant Dubey : महाशिवरात्रीलाही येथे दर्शनासाठी मंदिर बंद ठेवण्याचा निर्णय सर्वसामान्य नागरिकांनी स्वीकारला होता. मात्र या आगळ्यावेगळ्या घटनेमुळे नागरिक प्रशासनाविरुद्ध तीव्र नाराजी व्यक्त करत आहेत.
Bhimashankar Temple Opened for BJP MP Nishikant Dubey

Bhimashankar Temple Opened for BJP MP Nishikant Dubey

esakal

Updated on

घोडेगाव : श्री क्षेत्र भीमाशंकर मंदिर हे गेले अडीच महिन्यांपासून सर्वसामान्य भाविकांसाठी बंद असताना झारखंड राज्यातील खासदार निशिकांत दुबे यांच्यासाठी मंदिर खुले करण्यात आल्याने भाविकांकडून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. हे दर्शन आज (ता. १४) दुपारी दोनच्या सुमारास घेण्यात आले. महाशिवरात्रीलाही येथे दर्शनासाठी मंदिर बंद ठेवण्याचा निर्णय सर्वसामान्य नागरिकांनी स्वीकारला होता. मात्र या आगळ्यावेगळ्या घटनेमुळे नागरिक प्रशासनाविरुद्ध तीव्र नाराजी व्यक्त करत आहेत. महादेवाच्या मंदिरात असा दुजाभाव का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com