The Congress had made a confidentiality agreement Nirmala Sitharaman Claimed
The Congress had made a confidentiality agreement Nirmala Sitharaman Claimed 
देश

काँग्रेसनेच 'गोपनीयते'चा करार केला होता; सीतारामन यांचा पलटवार 

सकाळवृत्तसेवा

नवी दिल्ली : 'राफेल करारामध्ये संरक्षणमंत्री निर्मला सीतारामन यांनी देशाची दिशाभूल केली आहे', असा आरोप करणारे काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांच्या वक्तव्यावर सीतारामन यांनी पुराव्यासह उत्तर दिले. 'फ्रान्स आणि भारतामध्ये झालेल्या करारात गोपनीयतेचा मुद्दा आहे आणि काँग्रेस सरकारच्या कालावधीतच हा करार झाला आहे', असे सीतारामन यांनी लोकसभेत सांगितले. 

'राफेल करारासंदर्भात सीतारामन खोटे बोलल्या आहेत. भारताबरोबर कोणताही गोपनीय करार नाही, असे फ्रान्सच्या अध्यक्षांनीच मला सांगितले आहे', असा दावा राहुल गांधी यांनी केला होता. या वक्तव्यामुळे संतप्त झालेल्या सीतारामन यांनी खुलासा करण्यासाठी बोलण्याची संधी मागितली. काँग्रेसने गदारोळ घातल्यामुळे राहुल यांचे भाषण संपल्यानंतर सीतारामन यांना बोलण्याची संधी दिली जाईल, असे अध्यक्षा सुमित्रा महाजन यांनी सांगितले. 

सीतारामन म्हणाल्या, "2008 मध्ये फ्रान्स-भारतामध्ये करार झाला आहे. तत्कालीन संरक्षणमंत्री ए. के. अँटनी यांची या करारावर स्वाक्षरी आहे.'' यानंतर सीतारामन यांनी त्या करारातील गोपनीयतेविषयीच्या तरतुदीही वाचून दाखविल्या.

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amit Shah Fake Video Case : झारखंड काँग्रेसचं एक्स अकाऊंट सस्पेंड; अमित शाह व्हिडीओ प्रकरणात मोठी कारवाई

Daily Rashi Bhavishya : आजचे राशिभविष्य - 02 मे 2024

IPL 2024, CSK vs PBKS: पंजाब किंग्सने करून दाखवलं, चेन्नईला सलग पाचव्यांदा हरवलं

ग्रीन नोबेलचा मानकरी

Google Error : गुगल डाऊन! जगभरातील युजर्स त्रस्त; अमेरिकेतून 1400 तक्रारी

SCROLL FOR NEXT