congress1
congress1 
देश

BJP Vs Congress: काँग्रेस भाजपविरोधात 'ब्लॅक मॅजिक' करतंय! भाजपचा गंभीर आरोप

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली : काँग्रेस नेते राहुल गांधी यांची खासदारकी रद्द केल्याच्या कारणावरुन काँग्रेसनं आज संसद भवन परिसरात आंदोलन केलं. काळे कपडे परिधान करुन त्यांनी हे आंदोलन केलं, पण यावरुन आता भाजपनं काँग्रेसवर हल्लाबोल केला आहे. भाजपविरोधात कारवाया करताना काँग्रेसला आता ब्लॅकमॅजिक करावं लागतं आहे, अशा शब्दांत भाजप नेते पियुष गोयल यांनी त्यांच्यावर टीका केली. (Congress is doing black magic against BJP Serious accusation by Piyush Goyal)

गोयल म्हणाले, काँग्रेसनं निषेधासाठी काळे कपडे घालून आंदोलन करणार असल्याचं म्हटलं होतं. पण आपण काळे कपडे पाहिलेत का? काँग्रेस सध्या खूपच निराश झाली आहे, त्यांना आता ब्लॅक मॅजिकची मदत घ्यावी लागत आहे. ते पुढे म्हणाले, काँग्रेसच्या आंदोलनामागील हेतू त्यांना ओबीसींचा अपमान करायचा आहे. ते मनातून ओबीसींच्या विरोधात आहेत. राहुल गांधींना स्वतःला कायद्याच्यावर असल्याचं समजण्याचा अधिकार नाही.

कोर्टाच्या निर्णयानंतर आजवर १२ जणांची खासदारकी रद्द झाली आह. त्यांच्या पक्षातील नेत्यांनी त्यांना माफी मागून विषय संपवण्याच सल्ला दिला होता. पण त्यांनी त्यांचं ऐकलं नाही, यातून त्यांचा अरोगन्स दिसून येतो.   

हे ही वाचा : नोकरदार असाल तर रोखीनंच घ्या कार

काँग्रेस खासदारांना सभागृह चालू द्यायचं नाहीए ते सातत्यानं जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत आहे. आज काँग्रेसचे लोक काळ्या कपड्यामध्ये सभागृहात आले, त्यांना कायद्याचा अपमान करायचा आहे का? ओबीसींविरोधातील विधानाचं ते समर्थन करत आहेत का? की अनुसुचित जातींविरोधात ते आंदोलन करत आहेत? असा सवालही यावेळी पियुष गोयल यांनी केला. 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 RCB vs CSK Live Score: फाफ डू प्लेसिसचा भन्नाट कॅच अन् धोनीला 16 व्या ओव्हरलाच उतरावं लागलं मैदानात

Lok Sabha Election 2024: निवडणुकीदरम्यान 8,889 कोटींची रोकड, 4,000 कोटींचं ड्रग्ज जप्त! निवडणूक आयोगाची माहिती

Lok Sabha Election 2024 : रायबरेली, अमेठीत प्रचाराचा धडाका! राहुल गांधी विरुद्ध ‘स्थानिक’ असा तडका

Video: अत्यंत संतापजनक! भर बाजारात अल्पवयीन मुलीसोबत अश्लील वर्तन; व्हिडिओ पाहून तुम्हालाही येईल राग!

RCB vs CSK: सँटेनरनं बॉलला स्पर्श केला अन् डू प्लेसिस रनआऊट झाला, पण विकेट अडकली वादाच्या भोवऱ्यात

SCROLL FOR NEXT