देश

राहुल गांधी प्रकाश आंबेडकरांना भेटणार?

वृत्तसंस्था

नवी दिल्ली- वंचित बहुजन आघाडीने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत महाआघाडीत यावं यासाठी जोरदार प्रयत्न सुरू आहेत. राहुल गांधी हे प्रकाश आंबेडकर यांची भेट घेण्याची शक्यता आहे. राहुल गांधीही आंबेडकरांच्या भेटीसाठी अनुकूल आहेत. दरम्यान, आंबेडकरांच्या सर्व अटी मान्य करण्याची लेखी हमी काँग्रेस आणि राष्ट्रवादीला दिली आहे.

महाराष्ट्रात शिवसेना-भाजपा युतीचे आव्हान असताना कॉंग्रेसने मोटबांधणी करण्यास जोरदार तयारी केली आहे. कॉंग्रेस पूर्ण करू शकणार नाही अशा अटी आंबेडकरांनी ठेवल्या आहेत पण कॉंग्रेस तरीही सकारात्मक असल्याचे चित्र आहे. राहुल गांधी हे प्रकाश आंबेडकरांशी यांच्याशी चर्चा करायला तयार आहेत.

सध्याची परिस्थिती पाहता काँग्रेस राष्ट्रीय स्वयंसेवक संघाविरोधात लढायला तयार नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे काँग्रेसला आपण संघाच्या विरोधात लढण्यासाठी तयार असल्याचे सिद्ध करावे लागेल. अन्यथा चर्चेचे गाडे पुढे सरकणार नाही, असे आंबेडकर यांनी म्हटले होते. तसेच भारिप बहुजन महासंघ उमेदवार जाहीर केलेल्या जागांवर 100 टक्के लढेल. जागावाटपाच्या चर्चेत यावर कोणतीही तडजोड केली जाणार नाही, असेही प्रकाश आंबेडकर यांनी ठणकावून सांगितले आहे. आता प्रकाश आंबेडकरांचे हे प्रकरण राहुल गांधीकडे गेले आहे. त्यामुळे राहुल गांधी हे सर्व प्रकरण कसे हाताळतात हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Yogi Adityanath : जगाला शांतता संदेश देणाऱ्या सनातन परंपरेचा काँग्रेसनं अपमान केलाय, त्याचं अस्तित्व नाकारलंय; योगींचा घणाघात

Daily Panchang : आजचे पंचांग आणि दिनविशेष - 02 मे 2024

Sakal Podcast: शिर्डी मतदारसंघात काय होणार? ते तुरुंगातील नेत्यांना व्हर्च्युअल प्रचार करता येणार नाही

Amit Shah Fake Video Case : झारखंड काँग्रेसचं एक्स अकाऊंट सस्पेंड; अमित शाह व्हिडीओ प्रकरणात मोठी कारवाई

Latest Marathi News Live Update : काँग्रेस उमेदवाराच्या प्रचारासाठी राहुल गांधी आज कर्नाटक दौऱ्यावर

SCROLL FOR NEXT