देश

राहुल गांधीनी स्पष्ट केले 'मी कोणता ब्राह्मण'

वृत्तसंस्था

अजमेर (राजस्थान) :  पुष्करमधील ब्रह्माच्या मंदिरात दर्शनाला गेले असताना काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधीनी मंदिरात विधीवत पूजा केली. यादरम्यान, त्यांनी आपण कौल ब्राह्मण असल्यासोबतच त्यांचे दत्तात्रेय गोत्र असल्याचा उल्लेख केला आहे. याच नावाने त्यांनी मंदिरात पूजा केली आहे.

काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी आज (ता. 27) राजस्थानमधील अजमेर-कौल दौऱ्यावर असून, बाकी राज्यातील विधानसभा निवडणुकांचा प्रचार थांबल्याने म्हणून सर्वच पक्षांनी आपला मोर्चा आता राजस्थानकडे वळवला आहे. यावेळी राहुल गांधीनी आपल्या प्रचारदौऱ्याची सुरवात अजमेरमधील ख्वाजा गरीब नवाज यांच्या दर्ग्यावर डोकं टेकवून केली.
 

राहुल गांधी यांना भारतीय जनता पक्षाने जात आणि गोत्रावरून सातत्याने लक्ष्य केलेले असताना राहुल यांनी त्यांचे कौल ब्राह्मण जातीतील दत्तात्रेय हे गोत्र असल्याचा खुलासा केला आहे. भाजपचे प्रवक्ते सांबित पात्रा यांनी तर राहुल यांना या मुद्द्यावरून सातत्याने लक्ष्य केलेले आहे. 

दरम्यान, राहुल गांधी आज पोकरण, जालोर आणि जोधपूर येथील प्रचारसभेत संबोधित करणार आहेत. यासंदर्भात त्यांनी आपल्या ट्विटरवरूनही माहिती दिली होती की, ते आज पोकरण, जालोर आणि जोधपूरमध्ये प्रचारसभेसाठी उपस्थित राहणार आहेत.
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LSG vs MI : मुंबई पॉवर प्लेमध्ये 'पॉवर'लेस; लखनौनं प्ले ऑफचं गणित बिघडवलं?

Modi Latur Rally: "देवानं मला असं मॅन्युफॅक्चर केलंय की..."; PM मोदींनी सांगितलं आपण मोठाच विचार का करतो

Hardik Pandya LSG vs MI : भारतीय संघातील स्थान सेफ होताच हार्दिकचा भोपळा; मुंबईचा संघ आला अडचणीत

Shivam Dube: 'युवराजबरोबर तुलना मुर्खपणाचे...', टी20 वर्ल्ड कपसाठी निवड झालेला शिवम दुबे काय म्हणाला

Loksabha election 2024 : ''जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत मुस्लिमांना एससी, एसटी अन् ओबीसीतून आरक्षण मिळू देणार नाही'' मोदींचा काँग्रेसवर हल्ला

SCROLL FOR NEXT