congress take jibe at pm modi over different cloths while meeting couple boman bailey of the elephant whisperers  
देश

PM Narendra Modi: PM मोदी 'बेली अन् बोमन' यांना भेटले, फोटो पाहून काँग्रेस म्हणे 'फरक ओळखा!'

PM Narendra Modi: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी 'द एलिफंट व्हिस्पर्स' या ऑस्कर विजेत्या डॉक्युमेंट्रीमधील बोमन आणि बेली या जोडप्याची भेट घेतली.

रोहित कणसे

PM Narendra Modi: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी 'द एलिफंट व्हिस्पर्स' या ऑस्कर विजेत्या डॉक्युमेंट्रीमधील बोमन आणि बेली या जोडप्याची भेट घेतली. या भटीचे फोचो सोशल मीडियावर व्हायरल झाले असून फोटोंमध्ये पीएम मोदी हे दोन वेगवेगळ्या लूकमध्ये दिसत आहेत.यावरून विरोधी पक्ष काँग्रेसने निशाणा साधला आहे.

काँग्रेस नेत्याने शेअर केलेल्या या फोटोमध्ये पहल्या फोटोत पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पांढरा कुर्ता पायजमा आणि काळ्या रंगाचं नेहरू जॅकेट घातलेले दिलत आहेत. तर दुसऱ्या फोटोत ते जंगल सफारीसाठी खास खाकी रंगाचं शर्ट आणि पँट, टोपी अशा कपड्यांमध्ये दिसत आहेत. काँग्रेस नेते श्रीनिवास बीव्ही यांनी हे दोन्ही फोटो ट्वीट करत फरक ओळखा! असं म्हटलं आहे.

पंतप्रधान मोदी यांच्यावर यापूर्वी देखील त्यांच्या कपड्यांमुळे मोठ्या प्रमाणात टीका झाली आहे. आता देखील एकाच भेटीदरम्यान दोन वेगवेगळ्या कपड्यांमध्ये दिसल्याने त्यांच्यावर टीका होत आहे. (Latest Marathi News)

पंतप्रधान मोदी यांनी बोमन आणि बेली यांच्यासोबत काढलेल्या फोटोमध्ये हे जोडपं पोज देताना दिसत आहे. पंतप्रधान मोदी यांनी त्यांच्या ट्वीटर हँडलवर या जोडप्याला भेटल्याचे फोटो शेअर केले होते इतकेच नाही तर त्यांनी रघू या हत्तीसोबत देखील फोटो घेतले.

हेही वाचा - सामान्यांचा पैसा सुरक्षित ठेवण्यासाठीच Virtual Currency करकक्षेत

द एलिफंट व्हिस्पर्स

डायरेक्टर कार्तिकी गोंसाल्विस आणि प्रोड्यूसर गुनीत मोंगा यांच्या एलिफंट व्हिस्पर्स या शार्ट डॉक्युमेंट्रीला यंदाचा ऑस्कर पुरस्कार मिळाला आहे. या शॉर्ट डॉक्युमेंट्रीमध्ये एक जोप्याची कथा दाखवली आहे.

ज्यामध्ये बोमन आणि बेली हे एका रघु नावाच्या छोट्या हत्तीला वाढवतात. या डॉक्युमेंट्रीत हे जोडपं आणि त्यांचं हत्तीसोबतचं नातं दाखवण्यात आलं आहे. मार्च महिन्यात झालेल्या २०२३ ऑस्कर मध्ये शॉर्ट डॉक्युमेट्रीसाठी अकादमी पुरस्कार जिंकणारी ही पहिली फिल्म बनली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mohan Bhagwat: ७५ वर्षांसंबंधीचं 'ते' विधान भागवतांनी नेमकं का केलं? संघाकडून स्पष्टीकरण, विरोधकांचा मोदींवर रोख

Manchar News : काय सांगता! वृद्ध महिलेचे घरच गेले ‘चोरीला’; न्यायासाठी धावपळ सुरू

Latest Marathi News Updates : घरफोडीच्या गुन्ह्यात अटक, मुद्देमाल जप्त

Palghar News: वसई-विरारमध्ये नालासोपाऱ्यात अमली पदार्थांचा पर्दाफाश, 12 आरोपी अटक

IND vs ENG 3rd Test: 'चेंडू'वरून रामायण! शुभमन गिलचं वाद घालणं चुकीचं नव्हतं; अम्पायरने काय केले, ते वाचाच...

SCROLL FOR NEXT