President of india
President of india sakal
देश

नौदलाकडून सामर्थ्यात सातत्याने वाढ: राष्ट्रपती

सकाळ वृत्तसेवा

जामनगर : विविध मोहिमांचा सामना करणारे नौदल सातत्याने आपल्या सामर्थ्यात वाढ करत आहे, असे प्रतिपादन राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी आज केले. राष्ट्रपतींच्या हस्ते एका कार्यक्रमात ‘आएएनएस वालुसुरा’ ला प्रतिष्ठेचा ‘प्रेसिंडेंटस कलर’ पुरस्कार प्रदान करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. देशसेवेत शांतता तसेच युद्धात असामान्य योगदान दिल्याबद्दल लष्करातील विभागाला हा पुरस्कार दिला जातो.

यावेळी नौदलासह, हवाई दल, लष्कर या तिन्ही दलांचे सर्वोच्च प्रमुख असलेले राष्ट्रपती म्हणाले, की भारतीय नौदल सागरी क्षेत्रात आपल्या राष्ट्रीय हिताचे रक्षण करत आहे. गेल्या काही वर्षांमध्ये नौदल लढाईसाठी सज्ज, विश्वासार्ह आणि एकसंध शक्ती म्हणून उदयास आले आहे. हिंदी महासागर क्षेत्रातील ते एक पसंतीचे सुरक्षा भागीदार आहे. आपल्या राष्ट्रीय सागरी हिताचे रक्षण करण्यासाठी भारतीय नौदलाने सातत्याने दृढनिश्चय आणि दृढतेने सातत्याने विकसित होत आहे, ही अतिशय अभिमानाची बाब आहे, असेही त्यांनी नमूद केले. प्रेसिडेंट्स कलर’ पुरस्कार मिळाल्याबद्दल ‘आयएनएस वलसुरा’च्या अधिकाऱ्यांसह नौदलाच्या अधिकाऱ्यांचेही राष्ट्रपतींनी अभिनंदन केले.

‘आएएनएस वलसुरा’चे योगदान

‘आएएनएस वलसुरा’ वर १९४२ मध्ये स्थापन करण्यात आलेले नौदलाचे प्रमुख प्रशिक्षण केंद्र आहे. नौदलाचे अधिकारी व खलाशांना तसेच तटरक्षक दल आणि मित्रदेशांच्या अधिकाऱ्यांना या जहाजावर प्रशिक्षण दिले जाते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Share Market Opening: आठवड्याच्या शेवटच्या दिवशी शेअर बाजाराची जोरदार सुरुवात; निफ्टी नवीन विक्रमी उच्चांकावर

Covaxin: कोव्हिशिल्डच्या गोंधळानंतर कोव्हॅक्सिन बनवणाऱ्या भारत बायोटेकचा मोठा दावा, वाचा काय म्हणाली कंपनी

Crude Oil Prices: पेट्रोल-डिझेलचे दर होणार कमी! कच्च्या तेलाच्या किंमतीमध्ये मोठी घट

राहुल गांधी रायबरेलीतून लोकसभेच्या रिंगणात, अमेठीचा उमेदवारही ठरला; अखेर शिक्कामोर्तब

T20 World Cup: टीम इंडियात ४ फिरकी गोलंदाज का घेतले? कर्णधार रोहित शर्माने दिलं स्पष्टीकरण

SCROLL FOR NEXT