corona virus test esakal
देश

भारतात दोन टक्क्यांहून कमी लोकसंख्येला कोरोनाचा संसर्ग - केंद्र

केंद्र सरकारकडून राज्यांच्या कोरोना पॉझिटिव्हिटीची आकडेवारी जाहीर

Amit Ujagare (अमित उजागरे)

नवी दिल्ली : भारतात एकूण लोकसंख्येच्या दोन टक्क्यांहून कमी लोकसंख्येला (less than two percent population) कोरोनाचा संसर्ग झाला असून अद्यापही ९८ टक्के लोकसंख्येला कोरोनाची बाधा झालेली नाही, अशी माहिती मंगळवारी केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं (Ministry of Health) पत्रकार परिषदेत दिली. यावेळी केंद्रानं राज्यांच्या पॉझिटिव्हिटीची आकडेवारीही (state positivity rate) जाहीर केली. (Corona infection affects less than 2 percent of Indias population says Central Government)

देशात दिवसभरात सर्वाधिक सुमारे चार लाखांपर्यंत कोरोनाबाधित आढळून आलेले असताना आपण एकूण लोकसंख्येच्या तुलनेत दोन टक्क्यांहून कमी लोकसंख्येपर्यंत संसर्ग रोखण्यात यशस्वी ठरलो आहोत, असं केंद्रीय आरोग्य सहसचिव लव अग्रवाल यांनी सांगितलं. भारतातील एकूण लोकसंख्येच्या १.८ टक्के लोकसंख्येला कोरोनाचा संसर्ग झाला आहे तर ९८ टक्के लोकसंख्या अद्याप या संसर्गापासून दूर आहे, असंही त्यांनी म्हटलं. त्याचबरोबर गेल्या पंधरा दिवसांत सातत्याने अॅक्टिव्ह कोरोना रुग्णसंख्येत घट होत असल्याचंही सरकारनं यावेळी सांगितलं.

महाराष्ट्रात कोरोनाच्या प्रकरणांमध्ये घट

दरम्यान, आठ राज्यांमध्ये १ लाखांहून अधिक कोरोनाची प्रकरणं आढळून आली आहेत. २२ राज्यांचा कोरोना पॉझिटिव्हिटी रेट १५ टक्क्यांहून अधिक आहे. १३ राज्यांचा पॉझिटिव्हिटी रेट हा ५ ते १० टक्के आहे. तर एका राज्याचा पॉझिटिव्हिटी रेट सर्वांत कमी म्हणजेच ५ टक्क्यांहून कमी आहे. महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, बिहार, मध्य प्रदेश आणि छत्तीसगड या राज्यांमध्ये कोरोनाच्या प्रकरणांमध्ये घट झाली असून या राज्यांचा पॉझिटिव्हिटी रेटही कमी झाला आहे, असंही यावेळी आरोग्य सचिवांनी सांगितलं.

देशातील १९९ जिल्ह्यांमध्ये कोविडच्या प्रकरणांत घट

तसेच देशात १९९ जिल्ह्यांमध्ये सातत्याने कोविडची प्रकरणी कमी होताना दिसत आहेत. पर्यायानं या जिल्ह्यांचा गेल्या दोन आठवड्यापासून कोरोना पॉझिटिव्हिटीचा रेटही कमी होत आहे. देशात फेब्रुवारीच्या मध्यापासून आठवड्यातील कोरोना चाचण्यांचं प्रमाण सातत्याने वाढताना दिसत आहे. गेल्या १४ आठवड्यांमध्ये सरासरी दररोजच्या चाचण्यांचं प्रमाण अडीज टक्क्यांहून अधिक असल्याचं यावेळी आरोग्य सहसचिव अग्रवाल यांनी सांगितंल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shubman Gill: भारताच्या सर्वात मोठ्या विजयासह कर्णधार गिलने मोडला गावसकरांचा ४९ वर्षांपूर्वीचा विक्रम अन् घडवला नवा इतिहास

ENG vs IND: आकाश दीपने १० विकेट्ससह विक्रम कामगिरी बहिणीला केली समर्पित! कारणही आहे खूपच भावूक

CA Result: ‘सीए’च्या अंतिम परीक्षेत छत्रपती संभाजीनगरचा राजन काबरा देशात प्रथम; १४ हजार २४७ उमेदवार पात्र ठरले

WTC Points Table: टीम इंडियाने इंग्लंडविरुद्ध दुसऱ्या कसोटीतील विजयासह उघडलं गुणांचं खातं! जाणून घ्या टीम कोणत्या क्रमांकावर

Pune Viral Video: इंजिनिअरिंगमध्ये 3 वेळा नापास, तरुणाची पुण्यातील राजाराम पुलावरून नदीपात्रात उडी, व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT