Covaxin
Covaxin Sakal
देश

कोव्हॅक्सिनचे उत्पादन आता दुपटीने वाढणार

वृत्तसंस्था

नवी दिल्ली - देशभरातील लशींचा (Vaccine) तुटवडा (Shortage) दूर करण्यासाठी केंद्र सरकारने (Central Government) वेगाने पावले उचलायला सुरुवात केली असून कोव्हॅक्सिन (Covaxin) या लसीचे उत्पादन (Production) जूनपर्यंत दुप्पट करण्यात येईल त्यानंतर ऑगस्टपर्यंत ते सहा ते सात पटींनी वाढविण्यात येईल. (Covaxin production will now double)

येत्या सप्टेंबरच्या अखेरपर्यंत कोव्हॅक्सिन लसीचे उत्पादन दरमहा दहा कोटी डोसपर्यंत पोचेल, असा दावाही केंद्र सरकारकडून करण्यात आला आहे. ‘आत्मनिर्भर भारत ३.०’ अंतर्गत केंद्र सरकारने कोविड सुरक्षा ही मोहीम जाहीर केली आहे. या मोहिमेच्या माध्यमातून स्वदेशी बनावटी लशींच्या विकासाला चालना देण्याचा निर्धार केंद्र सरकारने केला आहे. या मोहिमेअंतर्गत भारत सरकारचा जैवतंत्रज्ञान विभाग लशींची निर्मिती करणाऱ्या संस्थांना आर्थिक मदत करत आहे. या माध्यमातून संबंधित संस्थांची उत्पादनक्षमता वाढविण्यावर भर दिला जाणार आहे. काही दिवसांपूर्वी आंतरमंत्रालयीन पथकाने लशींची निर्मिती करणाऱ्या दोन कारखान्यांना भेटी देत पाहणी केली केली होती तसेच उत्पादनामध्ये आणखी वाढ करण्याच्या सूचनाही केल्या होत्या. बंगळूरमधील भारत बायोटेक या कंपनीला केंद्र सरकारकडून ६५ कोटी रुपयांचे आर्थिक साहाय्य देण्याचे निश्‍चित करण्यात आले आहे.

केंद्राने आराखडा मागविला

सीरम इन्स्टिट्यूट आणि भारत बायोटेक या दोन्ही बड्या कंपन्यांनी लशींच्या उत्पादनाबाबतचा पुढील चार महिन्यांचा आराखडा केंद्र सरकारला सादर केला आहे. येत्या ऑगस्टपर्यंत लशींच्या उत्पादनात अनुक्रमे १० कोटी आणि ७.८ कोटींची वाढ करता येईल, असे या कंपन्यांनी म्हटले आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालय आणि औषध महानियंत्रकांनी या दोन्ही कंपन्यांकडून उत्पादनाशी संबंधित जून, जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबरसाठीचा आराखडा मागविला होता.

सहा महिन्यांत उत्पादन वाढवावे लागणार

मुंबईतील हाफकिन, हैदराबादेतील आयआयएल आणि बुलंदशहरमधील बीआयबीसोओएल या संस्थांतून कोरोनाप्रतिबंधक लशींची अधिक निर्मिती व्हावी म्हणून देखील केंद्र सरकारचे प्रयत्न सुरू आहेत. हाफकिन संस्थेलाही ६५ कोटी रुपयांचा निधी देण्यात आला आहे. या सर्व संस्थांना पुढील सहा आठ महिन्यांमध्ये त्यांची उत्पादनक्षमता वाढविण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

KKR vs DC : दिल्ली पॉईंट टेबलमध्ये मोठी उसळी घेणार की जेक फ्रेसर मॅर्कगर्कला केकेआर रोखणार?

CSK vs SRH Live IPL 2024 : ऋतुराजचं शतक हुकलं; सीएसकेने ठेवलं 213 धावांच आव्हान

Sambhajinagar : राज्यातील पहिल्या मोसंबी ग्रेडींग व्हॅक्सीन व कोल्ड स्टोरेज केंद्राचे काम पूर्णत्वाकडे

Share Market : शेअर बाजारातील किरकोळ गुंतवणूकदारांच्या संखेत वर्षात ४.०३ कोटींची वाढ; देशात 'हे' राज्य आघाडीवर

Pune Traffic Updates : पुणे विद्यापीठ चौकातील मेट्रोच्या कामानिमित्त वाहतुकीत बदल

SCROLL FOR NEXT