Crime against Congress leader renuka Chowdhury in hyderabad Crime against Congress leader renuka Chowdhury in hyderabad
देश

पोलिसाची कॉलर पकडणे भोवले; रेणुका चौधरीविरुद्ध गुन्हा, म्हणाल्या...

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली : पोलिस कर्मचाऱ्याची कॉलर पकडल्याप्रकरणी हैदराबाद पोलिसांनी काँग्रेस नेत्या रेणुका चौधरीविरुद्ध (renuka Chowdhury) गुन्हा दाखल (Crime) केला आहे. सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. ज्यामध्ये रेणुका चौधरी तेलंगणामध्ये पोलिसाची कॉलर धरताना दिसत आहेत. गुन्हा दाखल झाल्यानंतर स्वतःला स्थिर ठेवण्यासाठी पोलिसाला धरून ठेवावे लागले, अशी प्रतिक्रिया चौधरी यांनी दिली.

अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) काँग्रेस नेते राहुल गांधी यांची चौकशी केल्याने काँग्रेसतर्फे (Congress) निदर्शने करण्यात आली. ४३ सेकंदांच्या या व्हिडिओमध्ये रेणुका चौधरी पोलिस कर्मचाऱ्याशी वाद घालतानाही दिसत आहे. यानंतर महिला पोलिसांनी त्यांना पोलिस व्हॅनकडे ओढत नेल्याचे दिसते.

ईडीकडून (ED) राहुल गांधी यांची चौकशी केली जात आहे. सलग तीन दिवसांच्या चौकशीनंतर त्यांना पुन्हा शुक्रवारी चौकशीसाठी बोलावले आहे. अशात राहुल गांधी यांनी सोमवारपर्यंत चौकशी पुढे ढकलण्याची मागणी केली आहे. यावर ईडीकडून कोणतेही उत्तर आलेले नाही. चौकशीच्या निषेधार्थ काँग्रेस पक्षाच्या वतीने निदर्शने करण्यात आले.

नॅशनल हेराल्ड-एजेएल डीलशी संबंधित कथित मनी लाँड्रिंग प्रकरणासंदर्भात ही चौकशी सुरू आहे. तेलंगणा प्रदेश काँग्रेस (Congress) कमिटीचे प्रमुख आणि पक्षाचे खासदार ए. रेवंत रेड्डी, काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते मल्लू भाटी विक्रमार्का आणि इतर नेते राजभवनाच्या दिशेने जात असताना पोलिसांनी त्यांना प्रतिबंधात्मक ताब्यात घेतले. आंदोलनामुळे खैरताबाद सर्कल आणि परिसरात वाहतूक कोंडी झाली होती.

मी पोलिसावर हल्ला केला नाही

पोलिसावर हल्ला केला नाही. तरी मी त्याचा सामना करण्यासाठी तयार आहे. मी तोल गमावत होता. स्वतःला स्थिर ठेवण्यासाठी धरून ठेवावे लागले. आम्हाला मागे ढकलले जात होते, असे रेणुका चौधरी (renuka Chowdhury) गुन्हा दाखल झाल्यानंतर म्हणाल्या.

इतके पुरुष पोलिस का होते?

मागून मला ढकलत होते. माझ्या पायात समस्या आहे. माझा तोल गेल्याने पोलिसाच्या अंगावर पडली. यासाठी मी माफी मागते. परंतु, आमच्या आजूबाजूला इतके पुरुष पोलिस का होते, असा प्रश्न रेणुका चौधरी यांनी उपस्थित केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मनोज जरांगे पाटलांनी मध्यरात्री उपोषण सोडलं, सरकारने मागण्या केल्या मान्य; विखे-पाटील म्हणाले, चर्चा यशस्वी

Gold News: सोनं महागलं, आता ड्युटीचाही भार! सरकारच्या 'या' एका निर्णयाने सोन्याची चमक फिकी; खरेदीत तब्बल ७०% घट

IPL 2026 फायनलच्या २४ तासांपूर्वीच गुजरात टायटन्स संघ अडचणीत सापडला! अहमदाबादला पोहोचण्यास उशीर होणार; चिंता वाढली

Cotton Import Duty Waiver : कापूस आयातीवरील 11 टक्के सीमा शुल्क पूर्णपणे माफ; केंद्र शासनाकडून अधिसूचना जारी, वस्त्रोद्योगाला मोठा दिलासा

Raigad Infrastructure Upgrade: पालीकरांचे स्वप्न साकार; पाली-सुधागड एसटी बसस्थानक पुनर्विकासासाठी १४ कोटींची मंजुरी, तीन महिन्यांत भूमिपूजन

SCROLL FOR NEXT