farmer file photo
farmer file photo 
देश

पीकविम्यासाठी भरले 350 अन् मिळाले दोन रुपये

वृत्तसंस्था

बंगळुरू: कर्नाटकमधील एका शेतकऱयाने पीकविमासाठी भरले 350 रुपये आणि केंद्र सरकारकडून दोन रुपयांचा चेक शेतकऱयाला मिळाला आहे. राज्यातील अनेक शेतकऱयांना दोन, तीन व पाच रुपयांचे चेक आले आहेत, हे चेक पाहून अधिकारीही आश्चर्यचकीत झाले आहेत.

बेल्लारी जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त भागाचा केंद्र सरकारच्या अधिकाऱ्यांनी दौरा केला होता. शेतकऱ्यांची दुर्दशा अधिकाऱयांनी पाहिली होती. गेल्या दोन वर्षांपासून पीक विम्यासाठी प्रीमियमच्या स्वरूपात पैसे भरूनही विमा मिळाला नव्हता. यावेळी मात्र एका शेतकऱयाला दोन रुपयांचा चेक आला आहे. या शेतकऱयाने 350 रुपये पीकविम्यासाठी भरले आहेत. तिसऱ्या वर्षी विमा कंपनीकडून मिळालेला दोन रुपयांचा चेक या शेतकऱ्याने संबंधित अधिकाऱ्यांना दाखवला. शेतकऱ्याकडील तो चेक पाहून अधिकाही आश्चर्यचकीत झाले.

दरम्यान, विविध शेतकऱयांना दोन, तीन व पाच रुपयांचे चेक आल्यामुळे चर्चेचा विषय ठरला आहे. संबंधित वीमा कंपनीकडे याबाबत अधिकाऱ्यांनी विचारणा केली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Covishield बनवणाऱ्या कंपनीने ब्रिटिश कोर्टात मान्य केले लसीचे दुष्परिणाम! कोणते साईड एफेक्ट्स होतात जाणून घ्या

Share Market Opening: शेअर बाजाराची वाढीसह सुरुवात; निफ्टी बँक पुन्हा नवीन विक्रमी उच्चांकावर

Rohit Sharma Birthday : 'सलाम रोहित भाई...' मुंबईने टीम इंडियाच्या कर्णधारचा बड्डे अनोख्या पद्धतीने केला साजरा - Video

VIDEO: वडील असावेत तर असे! घटस्फोट झालेल्या मुलीचे माहेरी केले जंगी स्वागत; व्हिडिओ होतोय व्हायरल

Latest Marathi News Live Update : उत्तर मुंबईचे भाजपचे उमेदवार पियुष गोयाल आज भरणार उमेदवारी अर्ज

SCROLL FOR NEXT