देश

काश्मिरात सीआरपीएफ तुकडीवर दहशतवादी हल्ला; एक जवान हुतात्मा

पीटीआय

श्रीनगर - काश्मीरमधील अनंतनाग जिल्ह्यातील बिजबेहरा येथे दहशतवाद्यांनी केंद्रीय राखीव पोलिस दलाच्या (सीआरपीएफ) तुकडीवर हल्ला केला असून, या हल्ल्यात सीआरपीएफचा एक जवान शहीद झाला, तसेच तीन जवान जखमी झाले आहेत. तर या हल्ल्यात एका बारावर्षीय मुलाचा मृत्यू झाल्याची माहिती सीआरपीएफच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे. 

सीआरपीएफने दिलेल्या माहितीनुसार, दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास एका दुचाकीवरून आलेल्या दहशतवाद्यांनी सीआरपीएफच्या बटालियन ९० वर हल्ला केला. जवानांना राष्ट्रीय महामार्गाच्या सुरक्षेसाठी पाठवण्यात आले होते. यावेळी दहशतवाद्यांनी त्यांच्यावर हल्ला केला. या हल्ल्यात सीआरपीएफचा एक जवान आणि बारा वर्षांचा मुलगा जखमी झाला होता. दोघांनाही रुग्णालयात नेत असताना त्यांचे निधन झाले. 

त्रालमध्ये तीन दहशतवादी ठार 
दरम्यान, त्रालमध्ये झालेल्या सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमधील चकमकीत तीन दहशतवादी ठार करण्यात सुरक्षा दलाला यश मिळाले आहे. ही चकमक गुरुवारी रात्रीपासून सुरू झाली होती. या चकमकीनंतर दोन दहशतवाद्यांचे शव सुरक्षा दलांनी ताब्यात घेतले असून तर तिसऱ्या दहशतवाद्याचा मृतदेह शोधण्याचे काम सुरू असल्याचे प्रवक्त्यांनी सांगितले. 

महिनाभरात १५ चकमकी 
जम्मू-काश्‍मीरमध्ये या महिन्यात १५ चकमकींमध्ये आत्तापर्यंत ४६ दहशतवादी मारले गेले आहेत. तर बडगामच्या नरबल परिसरात बुधवारी लष्कर आणि पोलिसांनी केलेल्या संयुक्त कारवाईत लष्करे तोयबाच्या दहशतवाद्यांच्या पाच मदतनिसांना अटक करण्यात आली आहे. 

जम्मू श्रीनगर  पुणे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mayawati: "जोपर्यंत तो पूर्ण..." मायावतींनी तडकाफडकी भाच्याला राष्ट्रीय संयोजक पदावरून हटवले

Russia-Ukraine War: मानवी तस्करी प्रकरणी सीबीआयची मोठी कारवाई, रशियन नागरिकासह चौघांना अटक

Daily Rashi Bhavishya : आजचे राशिभविष्य - 08 मे 2024

ढिंग टांग : अस्सावा सुंदर नोटांचा बंगला..!

Latest Marathi News Live Update : अरुणाचल प्रदेशात भूकंपाचे धक्के, रिश्टर स्केलवर 3.1 तीव्रता

SCROLL FOR NEXT