Delhi Flood
Delhi Flood Sakal
देश

दिल्लीत महापुराचा धोका; यमुनेच्या पाण्याने धोक्याची पातळी ओलांडली

सकाळ न्यूज नेटवर्क / वृत्तसंस्था

नवी दिल्ली - गेले तीन दिवस कोसळणाऱ्या पावसाने (Rain) दिल्लीतील (Delhi) नागरिकांची असह्य उकाड्यापासून तत्कालिक सुटका झाली तरी हरियाना व उत्तर प्रदेशात (Uttar Pradesh) पावसाचा (Rain) कहर सुरू असल्याने यमुनेच्या (Yamuna River) पाणी पातळीत (Water Level) मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे दिल्लीसमोर आता महापुराचे (Flood) संकट उभे राहिले आहे. यमुनेच्या पाणीपातळीत २०५.३४ मीटरपर्यंत वाढ झाली असून पाण्याने धोक्याची पातळी ओलांडली आहे. (Danger of Floods in Delhi Waters Yamuna Exceeded Danger Level)

यमुना नदीतील पाणीपातळी कालपासून वाढू लागली. आज सकाळी ती २०५.२६ मीटरपर्यंत पोचली. त्यानंतर राज्य सरकारच्या प्रशासनाने नदीकाठी व सखल भागांत राहणाऱ्या नागरिकांना सुरक्षित स्थळी जाण्याचा इशारा दिला व झोपडपट्ट्यांतील नागरिकांचे स्थलांतर करण्यास वेगाने हालचाली सुरू केल्या. दिल्लीच्या सखल भागात प्रशासनाने अतिदक्षतेचा इशारा जारी केला आहे. सरकारच्या आपत्ती निवारण कक्षाच्या वतीने सुमारे २५ होड्या व पाणबुडे तसेच सुरक्षारक्षक नदीकाठी तैनात करण्यात आले आहेत. यमुनेवर असलेल्या जुन्या लोखंडी रेल्वेपुलाला पाणी लागले आहे. हरियानात मुसळधार पाऊस सुरू आहे. परिणामी यमुनानगर जिल्ह्यातील हाथिनीकुंड धरणातून पाण्याचा मोठ्या प्रमाणावर विसर्ग करण्यात येत असल्याने पाणीपातळी वाढली आहे.

हाथिनिकुंड येथील पाण्यावर दिल्लीकर अवलंबून असतात. खट्टर सरकारने अलीकडे पाणी सोडणे थांबवल्यावर दिल्ली सरकारने पाणीटंचाईची भीती व्यक्त केली होती आणि आता अतिरिक्त पाणी सोडल्याने यमुनेला पूर येण्याचे संकट उद्भवले आहे. या धरणातून मागील काही तासांत १ लाख ६० हजार क्यूसेस पाणी यमुनेत सोडण्यात आले व दिल्लीतील नदीची पाणीपातळी रात्रीतून वाढली. या धरणातून सोडलेले पाणी यमुनेच्या दिल्लीतील पात्रात पोहोचण्यास साधारणतः दोन दिवस लागतात. रोज पाणी सोडले जात असल्याने पाणीपातळी वेगाने वाढली आहे. यमुनेत २०४.५० मीटरपर्यंत पाणी आले की ती धोक्याची पातळी मानली जाते व सध्या २०५.३४ मीटरवर पाणी गेले आहे. परिणामी नदीकाठी राहणाऱ्या लोकांमध्ये घबराट पसरली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ब्रिटिश साम्राज्याच्या लोकशाहीतील पाऊलखुणा

राजकीय पक्षांच्या नजरेतून स्त्रियांचे प्रश्‍न

आयुर्वेदिक पंचकर्म

हसताय ना, हसलंच पाहिजे!

रक्तातील साखरेचे ‘हिस्टरी बुक’

SCROLL FOR NEXT