Nv ramana esakal
देश

दिल्लीला जाताना सावधान, हा सल्ला चुकीचा ठरला ...!

सरन्यायाधीश एन व्ही रमणा यांना निरोप

मंगेश वैशंपायन -सकाळ न्यूज नेटवर्क

नवी दिल्ली : दिल्ली उच्च न्यायालयात जेव्हा आपली बदली झाली तेव्हा ‘‘दिल्लीला जाताय ? सावधान ! दिल्लीचे लोक संस्कारी व विलक्षण जाणकार असतात पण तेवढेच प्रचंड आक्रमकही असतात' असा सल्ला आपल्याला देण्यात आला होता. मात्र येथे उच्च व सर्वोच्च न्यायालयात साऱयांचाच स्नेह व प्रेम मिळाले, अशी भावना मावळते सरन्यायाधीश एन व्ही रमणा यांनी आज व्यक्त केले. आपल्या कार्यकाळात सर्वोच्च न्यायालयाच्या कॉलेजियमने सुमारे २२५ न्यायमूर्तींच्या यशस्वीरीत्या नियुक्त्या केल्या याबद्दल न्या. रमणा यांनी समाधान व्यक्त केले.

दिल्ली उच्च न्यायालयातील प्रस्तावित साऱया न्यायमूर्तींच्या यादीला आपण मान्यता दिली आहे व केंद्रही यादी मंजूर करेल अशी आशा आपल्याला आहे असेही ते म्हणाले. आॅनलाईन न्यायालयीन कामकाज, न्यायालयांतील प्रचंड संख्येने प्रलंबित खटले, न्यायाधीशांच्या नियुक्त्या व न्यायालयांतील पायाभूत सुविधांत सुधारणा हा कायमच न्या. रमणा यांच्या जिव्हाळ्याचा विषय राहिला.

गेल्या १६ महिन्यांच्या कारकिर्दीनंतर सरन्यायाधीश रमणा आज निवृत्त झाले. त्यानिमित्त दिल्ली उच्च न्यायालय बार एसोसिएशन तर्फे झालेल्या निरोप समारंभात न्या. रमणा यांनी कारकिर्दीतील आठवणींना उजाळा दिला. दिल्ली उच्च न्यायालयातील आपला कार्यकाळ हा आपल्यासाठी दिल्लीत सरावण्याचे "लॉन्च पॅड" होते त्याच्याच मदतीने आपण एक यशस्वी सरन्यायाधीश म्हणून काम केले असे सांगून न्या. रमणा म्हणाले की ‘‘देशाचे सरन्यायाधीश म्हणून मी आपली कर्तव्ये यथासंभव निभावली आहेत. पायाभूत सुविधा व न्यायमूर्तींच्या नियुक्त्या या दोन विषयांवर माझे विशेष लक्ष होते हे तुम्ही जाणताच.

दिल्ली उच्च न्यायालयांतील न्यायमूर्ती प्रचंड काम करतात असे सांगून न्या. रमणा म्हणाले की साधारणतः देशात अन्य ठिकाणी दुपारी ४ पर्यंत न्यायमूर्ती निघून जातात. पण येथील न्यायमूर्ती रात्री ७ ते ८ व अनेकदा रात्री ९ पर्यंत आपापल्या चेंबरमध्ये बसलेले दिसत. मला सुरवातीला याचे आश्चर्यच वाटत असे. मला कधीही (वकील, न्यायालयीन कर्मचारी आदींचा) संप , धरणे आंदोलन यांचा सामना करावा लागला नाही. ही अप्रिय परिस्थिती माझ्या काळात उद्भवली नाही. दिल्लीती न्यायालयांत संप, धरणे आंदोलने होतात, तेव्हा सावध रहा, असा सल्ला मला देण्यात आला होता. पण येथे काम करताना कधीही अशा अप्रिय गोष्टींचा सामना करावा लागला नाही.

न्या. रमणा यांच्या निरोप समारंभाचे (सेरेमोनियल बेंच) थेट प्रसारण केले गेले. सर्वोच्च न्यायालयाच्या इतिहासात मुख्य न्यायमूर्तींच्या निरोप समारंभाचे थेट प्रसारण केले जाण्याचा हा पहिलाच प्रसंग होता. मागील वर्षी २४ एप्रिल रोजी देशाचे ४८ वे सरन्यायाधीश म्हणून न्या. रमणा यांनी शपथ घेतली. त्यांच्या १६ वर्षांच्या कार्यकाळातील अनेक आठवणींना अनेक न्यायाधीश, ज्येष्ठ विधिज्ञ कपिल सिब्बल यांच्यासह अनेकांनी भावपूर्ण शब्दांत न्या. रमणा यांच्याबद्दलच्या आठवणींना उजाळा दिला. न्या. रमणा यांच्या काळात सर्वोच्च न्यायालयात ज्या ११ न्यायमूर्तींची नियुक्ती झाली त्यात न्या. बीबी नागरत्न या महिला न्यायमूर्तींचाही समावेश आहे. अखेरच्या दिवशीही न्या. रमणा यांनी तब्बल ५ प्रकरणांची सुनावणी केली. त्यात निवडणुकीत फुकट वाटण्याच्या योजना, २००७ च्या गोरखपूर दंगली, कर्नाटकातील खाण घोटाळा, राजस्थानातील खाण लीज रकमेचे प्रकरण व दिवाळखोरी कायद्याची व्याप्ती यांचा समावेश होता.

आंध्र प्रदेशाच्या कृष्णा जिल्ह्यातील पोन्नावरम गावात एका सेतकरी कुटुंबात २७ आॅगस्ट १९५७ रोजी न्या. रमणा यांचा जन्म झाला. १० फेब्रुवारी १९८३ पासून त्यांनी (एकत्रित) आंध्र प्रदेश उच्च न्यायालयात वकीलीची प्रॅक्टीस सुरू केली. २७ जून २००० रोजी त्यांची नियुक्ती आंध्र उच्च न्यायालयात न्यायमूर्ती म्हणून झाली. न्या. रमणा यांनी १८ सप्टेंबर २०१३ मध्ये दिल्ली उच्च न्यायालयाचे व पुढच्याच वर्षी १७ फेब्रुवारीला सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती म्हणून काम पाहिले. न्या. अरविंद बोबडे यांच्या निवृत्तीनंतर २३ एप्रिल २०२१ पासून त्यांनी सरन्यायाधीश म्हणून कामकाज केले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Trumpet Symbol: शरद पवारांच्या राष्ट्रवादीला दिलासा! 'तुतारी'बाबत निवडणूक आयोगानं दिला मोठा निर्णय

Pune Politics : बंडखोर नक्की कोणाचा करणार गेम? माघारीसाठी सर्वच पक्षाचे नेते लागले कामाला!

Shrinivas Vanaga: "षडयंत्र रचून माझं तिकीट कापलं"; अज्ञातवासातून घरी परतेलल्या श्रीनिवास वानगांचा गंभीर आरोप

रणबीरमुळे Anushka Sharma ने ‘तमाशा’ चित्रपट सोडला, म्हणाली - हा चित्रपट नाकारला कारण...

घराघरात टीव्ही पोहोचवण्याचं स्वप्न बघणारे BPLचे फाऊंडर टी.पी. गोपालन नांबियार यांचं निधन

SCROLL FOR NEXT