Anushka Sharma Rejected Tamasha MovieESakal
Premier
रणबीरमुळे Anushka Sharma ने ‘तमाशा’ चित्रपट सोडला, म्हणाली - हा चित्रपट नाकारला कारण...
Anushka Sharma Rejected Tamasha Movie: अनुष्का शर्मा तमाशा नाकारला होता. याचे तिने आता कारण सांगितले आहे.
इम्तियाज अलीचा ‘तमाशा’ हा चित्रपट आजच्या काळातील कल्ट क्लासिक चित्रपट म्हणून ओळखला जातो. त्यामुळे आजही असंख्य चाहते या चित्रपटाला लाभले आहेत. या चित्रपटात सर्व काही होते. उत्तम कथा, उत्तम स्टारकास्ट, उत्तम गाणी आणि दमदार अभिनय. याशिवाय तांत्रिक बाबतीतही हा चित्रपट अगदी सरस ठरतो. प्रदर्शनाच्या वेळी ‘तमाशा’ फ्लॉप ठरला असेलही, पण आज प्रत्येक सिनेप्रेमींच्या पसंतीच्या यादीत तमाशाला निश्चितच वरचा क्रमांक मिळतो.

