Delhi High Court Anger expressed on Twitter
Delhi High Court Anger expressed on Twitter Delhi High Court Anger expressed on Twitter
देश

दिल्ली उच्च न्यायालयाने ट्विटरवर व्यक्त केला संताप, म्हणाले...

सकाळ डिजिटल टीम

जर डोनाल्ड ट्रम्प यांचे खाते ब्लॉक केले जाऊ शकते, तर हिंदू देवी-देवतांच्या विरोधात टिप्पणी करणाऱ्यांवर कारवाई का केली जात नाही? असे म्हणत दिल्ली उच्च न्यायालयाने (Delhi High Court) सोमवारी ट्विटरवर (Twitter) जोरदार टीका केली आहे. हे प्रकरण ट्विटर अकाउंटशी संबंधित आहे. ज्यावर हिंदू देवीच्या विरोधात आक्षेपार्ह सामग्री पोस्ट करण्यात आली होती.

मुख्य न्यायमूर्ती विपिन सांघी आणि न्यायमूर्ती नवीन चावला यांच्या खंडपीठासमोर इथिस्ट रिपब्लिक यूजरने माँ काली या नावाने केलेल्या पोस्टच्या संदर्भात सुनावणी झाली. खंडपीठाने ट्विटरला निर्देश दिले की, काही लोकांना कसे ब्लॉक केले आहे. काही प्रकरणांमध्ये इतर धर्मांना दुखावणारे साहित्य असूनही कारवाई झाली नाही. न्यायालयाने (Delhi High Court) ट्विटरला अधिक सावध आणि संवेदनशील राहण्यास सांगितले.

लिव्हलॉच्या रिपोर्टनुसार, जेव्हा अमेरिकन कंपनीने युक्तिवाद केला की वापरकर्ते येथे कोणत्याही प्रकारची पोस्ट करू शकतात. ती सर्व खाती ब्लॉक करू शकत नाही. त्यावर न्यायालयाने विचारले की मग तुम्ही ट्रम्प यांचे खाते कसे ब्लॉक केले? ट्विटरची (Twitter) भूमिका आणि ते खाते ब्लॉक करू शकत नाही, असे म्हणणे पूर्णपणे योग्य नाही, असेही न्यायालयाने म्हटले आहे.

आक्षेपार्ह पोस्ट काढल्याचे ट्विटरच्या वतीने हजर झालेले सिद्धार्थ लुथरा यांनी सांगितले. तसेच एफआयआरही नोंदवण्यात आला आहे. त्याचवेळी सरकारी वकील हरीश वैद्यनाथ यांनी सांगितले की, ज्या खात्याविरोधात तक्रार आली आहे ते खाते ब्लॉक करण्याची प्रक्रिया सुरू आहे. त्यानंतर न्यायालयाने सरकारला सध्याच्या प्रकरणातील सामग्री तपासण्यास सांगितले आणि आयटी कायद्यांतर्गत खाते ब्लॉक करायचे की नाही हे ठरवण्यास सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mayawati: "जोपर्यंत तो पूर्ण..." मायावतींनी तडकाफडकी भाच्याला राष्ट्रीय संयोजक पदावरून हटवले

Russia-Ukraine War: मानवी तस्करी प्रकरणी सीबीआयची मोठी कारवाई, रशियन नागरिकासह चौघांना अटक

Daily Rashi Bhavishya : आजचे राशिभविष्य - 08 मे 2024

ढिंग टांग : अस्सावा सुंदर नोटांचा बंगला..!

Latest Marathi News Live Update : अरुणाचल प्रदेशात भूकंपाचे धक्के, रिश्टर स्केलवर 3.1 तीव्रता

SCROLL FOR NEXT