Wrestlers Protest
Wrestlers Protest esakal
देश

Wrestlers Protest : आंदोलक पैलवानांवर दिल्ली पोलिसांकडून गुन्हे दाखल; 'या' कलमांतर्गत कारवाई

संतोष कानडे

नवी दिल्ली : जंतर-मंतरवर सुरू असलेल्या कुस्तीपटूंच्या आंदोलंनाविरोधात रविवारी पोलिसांनी कडक कारवाई केली . दिल्ली पोलिसांनी जंतरमंतरहून नवीन संसद भवनाकडे कूच करणाऱ्या कुस्तीपटूंना ताब्यात घेतले. दिल्ली पोलिसांनी जंतरमंतरवरील कुस्तीपटूंचा तंबूही हटवला.

या प्रकरणी आता आंदोलकांवर एफआयआर दाखल करण्यात आलेला आहे. भारतीय दंड संहितेच्या कलम १४७, १४९, १८६, १८८, ३३२, ३५३, पीडीपीपी कायद्याच्या कलम ३ अंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला.

कुस्तीपटूंनी नवीन संसद भवनाकडे कूच केल्यानंतर पोलिसांनी त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला. आंदोलक आणि पोलिसांमध्ये धक्काबुक्की झाली. पोलिसांनी १०९ जणांना ताब्यात घेतलं होतं. संपूर्ण दिल्लीमधून पोलिसांनी ८०० जणांना ताब्यात घेतलं.

या प्रकारानंतर देशभरातून केंद्र सरकार आणि पोलिसांविरोधात आक्रोश व्यक्त झाला. राहुल गांधी यांनी नाव न घेता नरेंद्र मोदी यांच्यावर निशाना साधला आहे. राहुल गांधी यांनी व्हिडीओ ट्वीट केला आहे. राहुल गांधी म्हणाले, "राज्याभिषेक पूर्ण, अहंकारी राजा रस्त्यावर जनतेचा आवाज चिरडत आहे."

देशाच्या नव्या संसद भवनाचे उद्घाटन आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पार पडलं. या कार्यक्रमास देशातील अनेक मान्यवरांनी उपस्थिती लावली. दुसरीकडे नवीन संसद भवनाच्या समोर आंदोलनासाठी निघालेल्या कुस्तीपटूंना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. यावेळी पोलीस- कुस्तीपटूंमध्ये राडा झाल्याचं देखील पाहायला मिळालं.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CAA Beneficiary: आधी सीएएची प्रमाणपत्रं वाटली आता तेच लाभार्थी थेट मोदींसोबत स्टेजवर!

IPL 2024 RCB vs CSK Live Score: आनंदाची बातमी! पावसाच्या व्यत्ययानंतर बेंगळुरू-चेन्नई सामन्याला पुन्हा सुरुवात

MI vs LSG: मुंबईच्या पराभवानंतर रोहितबरोबर नीता अंबानींची आधी गहन चर्चा अन् मग ड्रेसिंग रुममध्ये दिलं स्पेशल मेडल, Video व्हायरल

मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान करा, सहा महिन्यात POK भारताचा भाग होईल; योगींची मोठी घोषणा

Latest Marathi News Live Update : हे मोदींचे युग आहे, आम्ही घरी घुसून मारतो- पंतप्रधान मोदी

SCROLL FOR NEXT