shahrukh pathan  sakal
देश

पोलीसांवर बंदूक रोखलेल्या 'त्या' शाहरूखचं ग्रॅंड वेलकम, व्हिडीओ व्हायरल

पोलिस पुढे तर हजारो समर्थक मागे, जंगी स्वागताबाबत पोलिसांनी दिलं स्पष्टीकरण

सकाळ ऑनलाईन

सीएए कायद्याच्या निषेधार्थ फेब्रुवारी २०२० मध्ये दिल्लीच्या नॉर्थ ईस्ट भागात झालेल्या दंगलीने चांगलंच वातावरण पेटलं होत. संपूर्ण देश या दंगलींनी ढवळून गेला होता. याच दरम्यान या दिल्ली दंगलीतला एक व्हिडिओ मोठा व्हायरल झाला होता. ज्यात शाहरुख पठाण नावाच्या आरोपीने पोलिसांवर बंदूक ताणली होती. याप्रकरणी शाहरुखवर कारवाई करून त्याला अटक देखील करण्यात आली होती.

दरम्यान, सध्या पुन्हा एकदा एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय. ज्यात दिल्ली दंग्यातला आरोपी असलेल्या शाहरुखचं एखाद्या सेलिब्रेटीप्रमाणं जंगी स्वागत केलं जातंय. त्याच्या आजूबाजूला हजारो तरुणांची गर्दी पाहायला मिळतेय. आरोपी शाहरुखसुद्धा गर्दीला लोकांना हातात हात मिळवून प्रोत्साहन देत आहे. जसं काही तो कुठलं मोठं युद्ध जिंकून आलाय.

शाहरुखचा हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी याप्रकरणी स्पष्टीकरण दिलंय. व्हायरल झालेला हा व्हिडिओ २३ मेचा आहे. शाहरुखची जेलमधून काही सुटका झालेली नाही. त्याला काही तासांसाठी पेरोलवर बाहेर काढण्यात आलं होत. त्याचे वडील आजारी होते, त्यांना भेटता यावं म्ह्णून मोजून ४ तासांसाठी त्याला जेलमधून बाहेर काढण्यात आलं होत.

फक्त चार तासांसाठी जेलमधून बाहेर आलेला शाहरुख जेव्हा आपल्या राहत्या भागात गेला, तेव्हा त्याच्या स्वागतासाठी गर्दी तुटून पडली. पोलीस गर्दी पांगवण्याचा प्रयत्न करत होते. पण एवढी गर्दी आटोक्यात आणणं अवघड होत. शाहरुखचे समर्थक त्याच्या मागे- मागे चालत होते. लोक मोठयामोठ्याने ओरडून त्याच स्वागत करत होती. काहींनी या घटनेचा व्हिडिओ काढून सोशल मीडियावर व्हायरल केला आहे.

दरम्यान, दिल्ली दंगली प्रकरणी अटक करण्यात आलेल्या शाहरुखवर दंगल भडकावणे, खुनाचा प्रयत्न, धार्मिक शत्रुत्वाला प्रोत्साहन देण्याचे आरोप आहेत. शाहरुखला उत्तर प्रदेशच्या शामली जिख्यातून अटक करण्यात आली होती. सीएए करण्याच्या निषेधार्थ झालेल्या या ३ दिवसाच्या दिल्ली दंगलीत जवळपास ५० जणांचा मृत्यू तर २०० पेक्षा जास्त लोक जखमी झाले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ration Distribution: रेशनधारकांसाठी आनंदाची बातमी! ऑगस्ट ते ऑक्टोबरचे तीन महिन्यांचे धान्य एकाचवेळी मिळणार; वितरणात मोठा बदल

Latest Marathi News Live Update : पालखीच्या पुणे मुक्कामादरम्यान 72 संशयित चोर पोलिसांच्या ताब्यात

Pune Wari: टाळ-मृदंग, हरिनाम आणि रांगोळ्यांच्या पायघड्या; हडपसरमध्ये पालखी सोहळ्याला भक्तिमय स्वागत

Tanvi Khanna Exclusive: 'जानेवारीत जिच्याकडून हरले, तिलाच फायनलमध्ये हरवलं', शस्त्रक्रिया, बदलतं Squash अन् कमबॅकवर तन्वी झाली व्यक्त

Pune Ness: ना गटार स्वच्छ, ना जाळी दुरुस्त! पुण्यात महापालिकेच्या निष्काळजीपणाचा फटका तुटलेल्या जाळीत पाय अडकून पादचारी जखमी

SCROLL FOR NEXT