prime minister museum
prime minister museum sakal
देश

लोकशाहीमुळेच गरीब कुटुंबातील व्यक्तीला उच्च पद मिळाले

सकाळ वृत्तसेवा

नवी दिल्ली : स्वातंत्र्यानंतर देशात स्थापन झालेल्या प्रत्येक सरकारने देशाला उंचीवर नेण्यात मोठे योगदान दिले आहे, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. एक दोन अपवाद वगळता लोकशाही बळकट करण्याची अभिमानास्पद परंपरा देशाने जोपासली असल्याचेही मोदी म्हणाले. लोकशाहीची महान परंपरा असल्यामुळेच गरीब कुटुंबातील व्यक्ती ही पंतप्रधानपदापर्यंत पोचली, असेही मोदी म्हणाले.

देशातील पंधरा पंतप्रधानांच्या माहितीचा खजिना असलेल्या ‘पंतप्रधान संग्रहालयाचे’ उद्‌घाटन आज नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले. या वेळी ते बोलत होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संग्रहालयात प्रवेश करताना तिकीट खरेदी केले. मोदी म्हणाले, की या संग्रहालयाच्या माध्यमातून देशातील नागरिक इतिहास जाणून घेऊ शकतील आणि इतिहासात डोकावून भविष्याचा वेध घेऊ शकतील. स्वातंत्र्यानंतर काही काळ वगळता आपल्याकडे लोकशाही बळकट करण्याचीच परंपरा राहिली आहे. सध्या जग युद्धाच्या संकटात सापडले आहे. अशा स्थितीत संपूर्ण जग आपल्याकडे मोठ्या आशेने पाहत आहे.

भारताचा जाज्वल्य इतिहास, समृद्धीचा काळ याबाबत आपल्याला सर्वांनाच माहिती आहे. त्यावर आपण अभिमानही बाळगतो. पण भारताचा वारसा आणि सद्यःस्थितीचे जगाला चांगल्या रीतीने आकलन होणे देखील तितकेच गरजेचे आहे. आपल्याकडे अत्यंत ग्रामीण भागातून, दुर्गम ठिकाणावरून, अत्यंत गरीब कुटुंबातून, शेतकरी कुटुंबातून आलेली व्यक्ती पंतप्रधानपदापर्यंत पोचणे ही बाब भारतीय लोकशाहीच्या महान परंपरेवरचा विश्‍वास अधिक वृद्धींगत करणारी आहे. देश सध्या स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत असताना पंतप्रधान संग्रहालय प्रेरणादायी वास्तू म्हणून नावारूपास आली आहे. या माध्यमातून देशातील नागरिकांना माजी पंतप्रधानांच्या योगदानाची माहिती मिळेल आणि त्यांची पाश्‍र्वभूमी आणि संघर्षही जाणून घेता येणार आहे.

असे आहे पंतप्रधान संग्रहालय

  • केंद्र सरकारकडून २०१८ रोजी पंतप्रधान संग्रहालयाला मंजुरी

  • दहा हजार चौरस मीटर जमिनीवर उभारणी

  • आतापर्यंत २७१ कोटी रुपये खर्च

  • नेहरूंपासून मोदींपर्यंतच्या पंतप्रधानांचा

जीवनपट पहावयास मिळणार

भारतीय राज्यघटनेचा समावेश

पंतप्रधानांची दु्र्मीळ छायाचित्रे, भाषणे, व्हिडिओ क्लिप, वर्तमानपत्रे, मुलाखती, मूळ लेखनाचे प्रदर्शन

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 LSG vs RR : केएल शेर तर संजू सवा शेर! राजस्थानचा एक पाय प्ले ऑफमध्ये

DC vs MI : गोलंदाजीतली 'गळती' मुंबईच्या मुळावर; बॅटिंगमध्ये फर्स्ट क्लास तर बॉलिंगमध्ये नापास

Jolly LLB 3 : आता रंगणार जॉली विरुद्ध जॉली केस; सिनेमाच्या शूटिंगबाबत महत्त्वाची अपडेट आली समोर

Google वर जाहिराती करण्यासाठी भाजपने खर्च केले 100 कोटी; BJP पहिल्या स्थानावर तर काँग्रेस कितव्या स्थानावर? वाचा सविस्तर...

CM Yogi Aadityanath : ''काशी अन् अयोध्येनंतर आता मथुरेकडे प्रस्थान...'' योगी आदित्यनाथांचे स्पष्ट संकेत

SCROLL FOR NEXT