Dishtv Sun Direct and Tata Sky Try to Reduce NCF Burden on Subscribers Best Fit Plan
Dishtv Sun Direct and Tata Sky Try to Reduce NCF Burden on Subscribers Best Fit Plan 
देश

भारतीय दूरसंचारचा नवा 'बेस्ट फिट प्लॅन'

सकाळन्यूजनेटवर्क

नवी दिल्ली : भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाचे (ट्राय) नवीन डीटीएच आणि केबल टिव्ही नियम लागू झाल्यानंतर केबल ऑपरेटर्स आणि डीटीएच सर्विस प्रोवाइडर्स यांनी आपल्या ग्राहकांसाठी नवीन पॅक्स आणले आहेत. आपल्या यूजर्सना वेळेत आणि योग्य पद्धतीने प्राधिकरणाने केबल टिव्हीच्या पॅक्सची निवड करण्यासाठीच्या कालावधीचा अवधी 31 मार्च पर्यंत वाढवून दिला आहे. यामुळे रेग्युलेशन च्या अनुशंगाने केबल ऑपरेटर्स आणि डीटीएच ऑपरेटर्स, यूजर्सना त्याच वाहिन्यांसाठी चार्ज लावतील ज्या त्यांना बघायच्या आहेत.

मात्र, काही असे यूजर्स सुध्दा आहेत ज्यांनी नवीन नियमांनुसार आपले पॅक्स आणि वाहिन्यांची निवड केलेली नाही. या यूजर्ससाठी ट्राय ने एक नवीन 'बेस्ट फिट प्लॅन' देखील नुकताच लाँन्च केला आहे. या प्लॅन नुसार, यूजर्सना 31 मार्च 2019 पर्यंत आपल्या आवडत्या वाहिन्यांची निवड करावी लागणार आहे.

 

काय आहे 'बेस्ट फिट प्लॅन' ?
'बेस्ट फिट प्लॅन' हा ग्राहकांच्या वापरानुसार डिझाइन केला आहे. या प्लॅन मध्ये ग्राहक जी भाषा बोलतात त्यानुसार ते वाहिनी निवडू शकतात. याची काळजी घेण्यात आली आहे की, एका महिन्यांसाठी वाहिन्या निवडल्यानंतर मासिक बील शिवाय ग्राहकांना जास्तीचे पैसे देण्याची गरज पडणार नाही. हा प्लॅन केवळ तेच ग्राहक निवडू शकतात ज्यांनी 1 फेब्रुवारी 2019 पर्यंत कोणत्याच पॅक ची निवड केलेली नाही. हा प्लॅन सर्विस ऑपरेटरच ऑफर करु शकतात. मात्र, ऑपरेटर ला सांगून कोणत्याही पॅकला 'बेस्ट फिट प्लॅन' मध्ये बदलवता येऊ शकते. तसे ग्राहकांनी सांगितल्यानंतर 72 तासात हे करता येऊ शकते.  




जर आपण आतापर्यंत नव्या नियमानुसार पॅक्सची निवड केलेली नाही तर आपण 'बेस्ट फिट प्लॅन' ची निवड करु शकता. हे लक्षात घेण्यासारखे आहे की, सगळ्या डीटीएच ऑपरेटर्सने आपल्या प्लॅन्सची किंमत कमी केली आहे.
ज्यात डिश टिव्ही, सन डायरेक्ट, टाटा स्काय यांचा समावेश आहे. 
ग्राहकांना 100 वाहिन्यांचे 130 रुपये पेक्षा जास्त पैसे महिन्याचे द्यावे लागणार नाही, असे प्राधिकरणाकडून ठरविण्यात आले आहे. मात्र, जर ग्राहकांना 100 पेक्षा जास्त वाहिनी निवडायच्या असतील तर 101 वाहिनी ते 125 वाहिनी पर्यंत 20 रुपये जास्तीचे मोजावे लागतील. 


 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Video: रांग मोडून आत शिरला! आप आमदाराच्या मुलाची दादागिरी; पेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्यांना मारहाण

Mumbai News: बर्गर खाल्ल्याने तरुणाचा मृत्यू, मुंबईत घडली धक्कादायक घटना, वाचा नक्की काय आहे प्रकरण

Sanju Samson Wicket Controversy : संजू सॅमसन OUT की NOT OUT? कॅचवरून पेटला वाद; सामन्यादरम्यान मैदानात राडा

Hindustan Zinc : हिंदुस्थान झिंकच्या शेअर्समध्ये तेजी, डिव्हिडेंडच्या आशेने शेअर्समध्ये जोरदार खरदी...

Latest Marathi News Live Update : पश्चिम रेल्वेवर दादर येथे तांत्रिक बिघाड झाल्यामुळे गाड्या 15 ते 20 मिनिट उशिराने

SCROLL FOR NEXT