DMK MP Dayanidhi Maran triggered a row Uttar Pradesh and Bihar who come to Tamil Nadu end up cleaning toilets 
देश

युपी-बिहारचे लोक तमिळनाडूत येऊन शौचालय साफ करतात; DMK खासदाराचं वादग्रस्त वक्तव्य

डीएमकेचे खासदार दयानिधी मारन यांनी एक वादग्रस्त वक्तव्य केलं असून त्यामुळे मोठा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.

कार्तिक पुजारी

नवी दिल्ली- डीएमकेचे खासदार दयानिधी मारन यांनी एक वादग्रस्त वक्तव्य केलं असून त्यामुळे मोठा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. बिहार-यूपीतील लोक तमिळनाडूमध्ये येऊन शौचालय साफ करण्याचं काम करतात, असं ते एका व्हिडिओमध्ये म्हणताना दिसत आहे. सदर व्हिडिओ व्हायरल झाला असून भाजप आक्रमक होताना दिसत आहे.(DMK MP Dayanidhi Maran triggered a row Uttar Pradesh and Bihar who come to Tamil Nadu end up cleaning toilets )

उत्तर प्रदेश आणि बिहारमधील हिंदी भाषिक लोक तमिळनाडूमध्ये येऊन बांधकाम क्षेत्र किंवा रस्ते सफाई आणि शौचालय साफ करण्याचे काम करत असतात, असं दयानिथी मारन म्हणाले आहेत. भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते शेहझाद पुनावाला यांनी सदर व्हिडिओ शेअर करत इंडिया आघाडीवर निशाणा साधला आहे. उत्तर प्रदेश- बिहारमधील इंडिया आघाडीचा एकही नेता यावर का बोलत नाही? असा सवाल त्यांनी केला आहे.

मारन यांनी इंग्रजी येणारे लोक आणि हिंदी येणारे लोक यांच्यामध्ये तुलना केली आहे. ते म्हणाले की, 'इंग्रजी बोलणारे लोक मोठ्या पदावर आयटी कंपनीमध्ये काम करतात, तर हिंदी येणारे लोक हलक्या दर्जाची कामे करत असतात.' त्यांच्या या वक्तव्यानंतर भाजपकडून या प्रकरणाचा एक चांगला राजकीय मुद्दा करण्याचा प्रयत्न सुरु झाला आहे.

पुनावाला यांनी इंडिया आघाडीवर आरोप करण्यास सुरुवात केली आहे. इंडिया गट देशातील लोकांना जात, धर्म, भाषा याच्या आधारावर विभागण्याचा प्रयत्न करत आहे. इंडिया आघाडीचे नेते खासदार मारन यांच्यावर कोणतीही कारवाई करताना दिसत नाहीत. ते पुन्हा एकदा फोडा आणि राज्य कराची नीती अवलंबत आहेत, असं म्हणत त्यांनी निशाणा साधला.

पुनावाला यांनी नितीश कुमार, तेजस्वी यादव , लालू यादव, काँग्रेस अखिलेश यादव यांच्यावर निशाणा साधला. मागे डीएमके खासदार सैंथिलकुमार यांनी देखील हिंदी राज्यांबाबत द्वेषपूर्ण वक्तव्य केलं होतं. त्यावेळीही इंडिया आघाडीचे नेते गप्प होते, असं ते म्हणाले. त्यांनी राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांच्यावरही टीका केली. (Latest Marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Cyber Crime : सायबर ठगांनी पोलिस अधिकाऱ्यालाच १७ दिवस 'डिजिटल अरेस्ट' मध्ये ठेवले; २२ लाख उकळले अन्...

Latest Maharashtra News Updates : कोल्हापुरात पंचगंगेच्या पातळीत एक फुटाने वाढ, ५० बंधारे पाण्याखाली

Ashadhi Ekadashi 2025 Recipe: आषाढी एकादशीच्या उपवासाला बनवा पौष्टिक रताळ्याचे कटलेट, सोपी आहे रेसिपी

Mobile Addiction : बाबा, गेम खेळू दे...नकार मिळताच मुलीने संपवल आयुष्य! कळंब हादरलं

मोठी बातमी! पहिल्या फेरीत प्रवेश न घेतल्यास विद्यार्थ्यांना चौथ्या फेरीपर्यंत थांबावे लागणार; दुसऱ्या फेरीसाठी पसंतीक्रम नोंदविण्यास १३ जुलैपर्यंत मुदत

SCROLL FOR NEXT