Ajit Doval
Ajit Doval 
देश

डोवाल पुन्हा राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारपदी; मिळणार कॅबिनेट मंत्रीपदाचा दर्जा

वृत्तसंस्था

नवी दिल्ली : अजित डोवाल यांची पुन्हा एकदा राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारपदी (एएनआय) नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच त्यांना कॅबिनेट मंत्रिपदाचा दर्जा देखील बहाल करण्यात आला आहे.

ही नियुक्ती पुढील पाच वर्षांसाठी असणार आहे. 2014 साली त्यांची राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. त्यानंतर सलग दुसऱ्यांदा डोवाल यांची सल्लागारपदी पुन्हा एकदा नियुक्ती करण्यात आली आहे.
 
डोवाल यांच्या मार्गदर्शनाखाली 2016 मध्ये उरी येथे आणि 2019 मध्ये बालाकोट येथे सर्जिकल स्ट्राईक करण्यात आला होता. डोवाल हे 1968 च्या बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत. तसेच त्यांनी इंटेलिजन्स ब्युरो (आयबी) चे प्रमुखपद भूषविले आहे. डोवाल हे कीर्ती चक्र मिळविणारे पहिले पोलिस अधिकारी आहेत. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pakistan: सौदीच्या प्रिन्सने पाकिस्तानला पाठवली ५० लोकांची खास टीम, शाहबाज सरकारसोबत नेमकं मिशन काय?

Latest Marathi News Update : गडचिरोलीत CRPF चे सर्च ऑपरेशन, मिळाले विस्फोटकांनी भरलेले सहा प्रेशर कुकर

Hemant Karkare: अन् करकरेंच्या पत्नीने नाकारले मोदींचे एक कोटी रुपये, 16 वर्षांपूर्वी नेमकं काय घडलं होतं?

Jalgaon Summer Heat : मतदान केंद्रावर मिळणार ‘ग्लुकोज-डी, ओआरएस, बीपी, शुगर’ची गोळी; मतदारांनो, बिनधास्त पडा घराबाहेर

Pune Loksabha election 2024 : पुणे शहरासाठी रवींद्र धंगेकर यांचा स्वतंत्र जाहीरनामा; नवीन आश्वासनं कोणती?

SCROLL FOR NEXT