देश

दिल्लीच्या आरोग्यमंत्र्याना ED कडून अटक होण्याची शक्यता - CM केजरीवाल

सुधीर काकडे

आगामी काळातील विधानसभा निवडणुकांच्या (Assembly elections 2022) पार्श्वभूमीवर उत्तर भारतात राजकीय हालचालींना वेग आला आहे. एकीकडे उत्तर प्रदेश आणि दुसरीकडे पंजाबसारख्या महत्वाच्या राज्यांमध्ये सत्ता मिळवण्याासाठी भाजप, काँग्रेससह आम आदमी पक्षानेही जोरदार तयारी सूरू केली आहे. त्यातच आता दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (CM Arvind Kejriwal) यांनी रविवारी केंद्रीय यंत्रणांवर निशाणा साधला आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ED कडून दिल्लीचे आरोग्य मंत्री सत्येंद्र जैन (Delhi Health Minister Satyendar Jain) यांना अटक होऊ शकते असं केजरीवाल यांनी सांगितलं आहे.

पंजाबमध्ये यंदा आम आदमी पक्षाने जोरदार तयारी सुरू केली आहे. काँग्रेसनंतर आम आदमी पक्षच पंजाबमध्ये मोठा पक्ष असेल अशी शक्यता राजकीय विषयातील तज्ञांकडून व्यक्त केली जातेय. त्याच पार्श्वभूमीवर आप आणि भाजपमधील संघर्ष वाढत जाताना दिसत आहे. आम्हाला आमच्या सूत्रांकडून कळलं आहे की, पंजाबमधील निवडणुकीच्या अगोदर दिल्लीचे आरोग्य मंत्री सत्येंद्र जैन यांना ED अटक करणार आहे. सत्येंद्र जैन यांच्या मालत्तांवरवर यापूर्वी दोनदा ED ने छापे टाकले, मात्र ते रिकाम्या हाताने परतले असंही ते म्हणाले आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

One Chip Challenge: अति मसालेदार चिप्स खाल्ल्याने हृदयविकाराचा झटका; तरुणाने गमावला जीव

Hardik Pandya Banned : T20 वर्ल्ड कपपूर्वी BCCIने हार्दिक पांड्यावर घातली बंदी! 'या' चुकीची मोजावी लागली किंमत

Loksabha News: मोदींनी घेतली नाही ठाकरेंच्या मागण्यांची दखल, नागरिकांमध्ये रंगल्या चर्चा

IPL 2024 : लाजिरवाण्या पराभवासह मुंबई इंडियन्सचा प्रवास थांबला; पांड्या म्हणाला, फक्त हा सामनाच नव्हे तर...

Share Market Today: शेअर बाजाराच्या विशेष सत्रात आज कोणते शेअर्स असतील तेजीत? काय आहे तज्ज्ञांचा अंदाज

SCROLL FOR NEXT