वेळ साधली! उत्तर प्रदेशाच्या मतदानाआधी देशाचा अर्थसंकल्प

Budget-nirmala-sitharaman
Budget-nirmala-sitharaman

मोदी सरकार टायमिंग साधण्याच्या बाबतीत कायम उजवे ठरले आहे. त्यामुळे प्रसिद्धी आणि काँट्रोव्हर्सी या दोन्ही गोष्टींचा सामना सरकारला सतत करावा लागतो. यंदाही पुन्हा तीच परिस्थिती आहे. (Union Budget 2022)

देशाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन फेब्रुवारी महिन्यात पार पडणार आहे. येत्या १ फेब्रुवारीला अर्थमंत्री निर्मला सीतारामन बजेट सादर करतील, अंदाजपत्रक तयार करण्यासाठी सुमारे 6 महिने लागतात. त्यानंतर ते लोकांसमोर मांडलं जातं. यावेळी निर्मला सीतारामन त्यांच्या कारकिर्दीतील चौथा अर्थसंकल्प सादर करतील. यावर प्रामुख्याने दोन घटकांचा प्रभाव पाहायला मिळणार आहे.

पहिला महत्वाचा विषय म्हणजे यंदा 5 राज्यांमध्ये होणार्‍या निवडणुका, आणि कोरोनाची तिसरी लाट. ज्याचा सर्वाधिक संसर्ग फेब्रुवारी महिन्यात अपेक्षित आहे. उत्तर प्रदेश आणि पंजाबच्या मतदानामुळे यंदा निवडणुकीचं महत्व वाढलंय. (UP Election 2022) याव्यतिरिक्त उत्तराखंड, गोवा आणि मणिपूरमध्ये निवडणुका आहेत.

तिनही राज्यात सध्या भाजपची सरकारं आहेत. या राज्यांमध्ये 10 फेब्रुवारी ते 7 मार्च दरम्यान सर्व निवडणुका पार पडणार आहेत. तर 10 मार्च रोजी मतमोजणी होणार आहे. म्हणजेच यावेळी अर्थसंकल्प निवडणुकीपूर्वी घोषित करणार असून त्याचा परिणाम येणाऱ्या विधानसभा निवडणुकांवर होऊ शकतो.

अर्थसंकल्पावर परिणाम करणारा आणखी एक घटक म्हणजे कोरोनाची तिसरी लाट! डिसेंबरपासूनच सुरू झालेल्या लाटेमुळे बजेटवर परिणाम होणार आहे. ओमिक्रॉनमुळे संक्रमण अधिक वेगाने पसरत आहे. याबद्दल शास्त्रज्ञांमध्ये मतमतांतरं आहेत. NITI आयोगाचे उपाध्यक्ष राजीव कुमार यांच्या म्हणण्यानुसार ओमिक्रॉनची ही लाट खूप वेगाने वाढत आहे मात्र, ती वेगानेच कमी होईल. त्याचा अर्थव्यवस्थेवर फार मर्यादित परिणाम होईल असेही त्यांनी म्हटलं आहे. त्यांचा विश्वास आहे की 2021-22 मध्ये जीडीपी वाढ 9-9.2 टक्क्यांपर्यंत असू शकतो.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com