Election 2023 PM Modi 40 rally in four states Why is there not one in rally Mizoram 
देश

Election 2023: चार राज्यात पंतप्रधान मोदींच्या ४० सभा; मिझोराममध्ये एकही का नाही?

पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुका घोषित झाल्यानंतर राजकीय पक्षांनी प्रचार सभांचा धडाका लावला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वत: मिझोराम सोडून चार राज्यांमध्ये ४० सभा घेतल्या आहेत.

कार्तिक पुजारी

नवी दिल्ली- पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुका घोषित झाल्यानंतर राजकीय पक्षांनी प्रचार सभांचा धडाका लावला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वत: मिझोराम सोडून चार राज्यांमध्ये ४० सभा घेतल्या आहेत. त्यातील सर्वाधिक सभा त्यांनी मध्य प्रदेशमध्ये घेतल्या आहेत. पण, मोदींनी ईशान्येकडील राज्य मिझोराममध्ये एकही सभा घेतली नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. (Election 2023 PM Modi 40 rally in four states Why is there not one in rally Mizoram)

९ ऑक्टोबरला पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकांची घोषणा निवडणूक आयोगाकडून करण्यात आली. त्यातील मध्य प्रदेश, छत्तीसगड, राजस्थान आणि मिझोराम राज्यांमध्ये मतदान झालंय, तर तेलंगणामध्ये ३० नोव्हेंबरला मतदान होणार आहे. त्यानंतर ३ डिसेंबरला सर्व राज्यांतील निवडणुकीचा निकाल लागेल. त्यावेळी कोणच्या पक्षाने बाजी मारली याचे चित्र स्पष्ट होईल.

कोणत्या राज्यात किती सभा?

पंतप्रधान मोदी यांनी छत्तीसगडमध्ये पहिली प्रचारसभा घेतली होती. छत्तीसगडमध्ये ९० जागांसाठी मतदान झाले. मध्य प्रदेशात मोदींनी एकूण १४ सभा घेतल्या आणि इंदौरमध्ये एक रोड शो घेतला. मध्य प्रदेशात २३० जागांसाठी मतदान पार पडलं. राजस्थानमध्ये मोदींनी एकूण १२ सभा घेतल्या. २०० जागांसाठी २५ नोव्हेंबरला मतदान पार पडलं. तेलंगणामध्ये मोदींनी एकूण ८ सभा आणि हैद्राबादमध्ये एक रोड शो घेतला आहे. तेलंगणात ९० जागांसाठी ३० नोव्हेंबरला मतदान पार पडेल.

मिझोराममध्ये एकही सभा नाही

मिझोरामसाठी ४० जागांसाठी सात नोव्हेंबर रोजी मतदान पार पडले होते. पंतप्रधान मोदी यांनी या राज्यात कोणतीही सभा किंवा इतर कार्यक्रम घेतलेला नाही. मिझोराममध्ये सत्ताधारी मिझो नॅशनल फ्रन्ट आणि प्रमुख विरोधी पक्ष जोराम पीपल्स मुव्हमेंट यांच्यामध्ये लढत आहे. काँग्रेसने सर्व ४०, भाजपने २३ आणि आम आदमी पक्षाने चार जागांवर उमेदवार उभे केले होते.

विरोधी पक्षांनी दावा केलाय की पंतप्रधान मोदी मणिपूरमध्ये गेले नाहीत. त्यामुळे आता निवडणूक प्रचारासाठी ते मिझोराममध्ये गेल्यास त्यांच्यावर टीका होईल यासाठी ते राज्यात गेले नाहीत. (Latest Marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

अंबरनाथमध्ये सत्तासंघर्षाला नवं वळण! व्हीप न मानल्यास अपात्रतेची कारवाई, राष्ट्रवादीच्या नगरसेवकांना भाजपचा इशारा

Solapur News: भारतातील सर्वात मोठा दगडी चक्रव्यूहाच्या संवर्धनासाठी ‘इंट्याक’ची हाक; खडकीतील दोन हजार वर्षांपूर्वीचा वारसा पाहण्यासाठी ‘हेरिटेज वॉक’!

Latest Marathi News Live Update : परभणीत ५ एकरातला ऊस जळून खाक

Uddahv Thackeray : ‘भाजपकडून राज्यात भ्रष्टाचाराचे प्रदूषण’

CM Devendra Fadnavis : पुण्याची क्षमता २८० बिलियन डॉलर्सची; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी मांडला पुण्याच्या विकासाचा ‘रोडमॅप’

SCROLL FOR NEXT