India likely playing XI vs West Indies Super 8
esakal
India likely playing XI vs West Indies Super 8 : भारताच्या उपांत्य फेरीच्या मार्गात आता फक्त वेस्ट इंडिजचा अडथळा राहिला आहे. ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेतील सुपर ८च्या या लढतीत विजेता संघ उपांत्य फेरीत पोहोचणार आहे आणि हा ब्लॉकबस्टर सामना कोलकाताच्या इडन गार्डनवर १ मार्च, रविवारी होणार आहे. संजू सॅमसन आणि अभिषेक शर्मा या जोडीने झिम्बाब्वेविरुद्ध भारताला यंदाच्या वर्ल्ड कपमधील सर्वोत्तम सुरुवात करून दिली. त्यामुळे ही जोडी वेस्ट इंडिजविरुद्ध कायम राहण्याची शक्यता बळावली आहे. पण, विंडीजचा सामना करण्यासाठी भारताच्या अंतिम ११ मध्ये एक बदल नक्की होईल.