mohan_bhagwat
mohan_bhagwat 
देश

अयोध्येत फक्त राममंदिरच - मोहन भागवत

पीटीआय

उडुपी (कर्नाटक) : अयोध्येतील वादग्रस्त जागेवर राममंदिराव्यतिरिक्त अन्य कोणतीही वास्तू उभारली जाणार नाही, अशी घोषणा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी आज येथे विश्‍व हिंदू परिषदेच्या वतीने (विहिंप) आयोजित धर्मसंसदेमध्ये बोलताना केली. राममंदिराची उभारणी ही केवळ लोकप्रिय घोषणा नसून, तो आमच्या श्रद्धेचा विषय आहे. यामध्ये कोणताही बदल केला जाणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. 

अनेक वर्षांचा त्याग आणि प्रयत्नांनंतर राममंदिराची उभारणी शक्‍य असल्याचे दिसू लागले आहे. सध्या हा विषय न्यायालयाच्या विचाराधीन आहे. कोणत्याही स्थितीत अयोध्येमध्ये राममंदिर उभारले जाईल, असेही त्यांनी नमूद केले. पूर्वी ज्या ठिकाणी मंदिर होते तेथेच ही वास्तू उभारण्यात येईल. या मंदिराच्या निर्मितीसाठी पूर्वीच्याच दगडांचा वापर करण्यात येईल. रामजन्मभूमी आंदोलन 25 वर्षांपूर्वी ज्यांच्या नेतृत्वाखाली सुरू झाले, त्यांचेच या वास्तूच्या निर्मितीसाठी मार्गदर्शन घेण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले. राममंदिराच्या उभारणीसाठी लोकांमध्ये जनजागृती करणे आवश्‍यक आहे. आम्ही आमच्या ध्येयाच्या अगदी जवळ असताना आम्हाला अधिक सावध राहायला हवे, असेही त्यांनी नमूद केले. 

यावर होणार चर्चा 
विश्‍व हिंदू परिषदेच्या या धर्मसंसदेमध्ये राममंदिराची उभारणी, धर्मांतरास पायबंद आणि गोरक्षण अशा अनेकविध मुद्द्यांवर चर्चा होणार आहे. जात आणि लिंगाच्या आधारावर होणारा भेदभाव आणि विशिष्ट वर्गाला दिली जाणारी सापत्न वागणूक आदी बाबी या संमेलनाच्या केंद्रस्थानी असतील, अशी माहिती सूत्रांनी दिली. 

घटनेचे पालन करा : तोगडिया 
विश्‍व हिंदू परिषदेचे आंतरराष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रवीणभाई तोगडिया यांनी देशभरातील लोकांना राज्यघटनेचे अनुसरण करण्याचे आवाहन करत धर्मनिरपेक्षतेचे तत्त्व अंगीकारण्याचे आवाहन केले. धर्मसंसदेच्या उद्‌घाटनपर भाषणामध्ये बोलताना ते म्हणाले, "भारतीय राज्यघटना खऱ्या धर्मनिरपेक्षतेच्या तत्त्वाचा पुरस्कार करते; पण हेच तत्त्व आमची मंडळी पाळत नाहीत. मंदिरे आणि मठांवर सरकारचे नियंत्रण असता कामा नये, त्या मंदिराचे आणि मठाचे प्रमुख त्यावर लक्ष ठेवतील. सध्या याबाबत जे काही सुरू आहे ते घटनाबाह्य असल्याचेही त्यांनी नमूद केले". 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

कोरोना लसीच्या सर्टिफिकेटवरुन PM मोदींचा फोटो काढला! आरोग्य मंत्रालयाने का घेतला निर्णय?

Vishal Patil: "विशाल पाटील भाजपची बी टीम," चंद्रहार पाटलांचा सनसणीत आरोप; प्रचाराच्या अंतिम टप्प्यात सांगलीचा पार चढणार

Johnson Baby Powder: जॉन्सन अँड जॉन्सन कर्करोगाचे खटले निकाली काढणार; कंपनी देणार 6.5 अब्ज डॉलर्सची भरपाई

CSK Playoffs Scenario : CSKवर टांगती तलवार... प्ले-ऑफमध्ये जाण्यासाठी उरला एकच रस्ता; अन्यथा टॉप-4 मधून पत्ता कट

Navi Mumbai Crime: उरण मधील महिलेच्या हत्या प्रकरणात दुसरा आरोपी अटकेत, वय फक्त १९ वर्ष

SCROLL FOR NEXT