GK-2 Nursing Home Fire esakal
देश

नवीन वर्षात मोठी दुर्घटना; रुग्णालयाला लागली भीषण आग; दोघांचा होरपळून मृत्यू, अनेक जण बचावले

पोलीस आणि अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळावरून आतापर्यंत 6 जणांची सुटका केलीये.

सकाळ डिजिटल टीम

पोलीस आणि अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळावरून आतापर्यंत 6 जणांची सुटका केलीये.

नवी दिल्ली : दिल्लीतील ग्रेटर कैलास भागात रविवारी पहाटे एका नर्सिंग होममध्ये (GK-2 Nursing Home Fire) लागलेल्या आगीत किमान 2 जणांचा होरपळून मृत्यू झाला. मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना आज पहाटे 5.15 वाजता घडलीये.

पोलीस आणि अग्निशमन विभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळावरून आतापर्यंत 6 जणांची सुटका केलीये. या आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या 4 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आणि त्यांनी आगीवर नियंत्रण मिळवण्यास सुरुवात केली. सुमारे 1 तासाच्या प्रयत्नानंतर अग्निशमन दलाच्या जवानांनी आग आटोक्यात आणलीये.

दरम्यान, आगीचं कारण अद्याप समजू शकलेलं नाही. पोलीस पथक घटनास्थळाची पाहणी करत आहे. तत्पूर्वी, 17 डिसेंबरच्या सकाळी दिल्लीतील ग्रेटर कैलास पार्ट-1 येथील फिनिक्स हॉस्पिटलमध्ये आग लागली होती. रुग्णालयाच्या तळघरात आग लागल्याची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या 5 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आणि त्यांनी आगीवर नियंत्रण मिळवलं. फिनिक्स रुग्णालयात सकाळी 9.30 वाजता आग लागल्याची माहिती अग्निशमन विभागाला मिळाली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Iran-America War: वडिलांच्या हत्येचा बदला घेणार! मोज्तबा खामेनेई यांची शपथ; युद्ध भडकणार?

Supriya Sule: 'लाडकी बहीण' योजनेत भाऊ कसा?; सुप्रिया सुळे यांचा महायुती सरकारवर जोरदार हल्लाबोल; कर्जमाफीची फक्त घोषणाबाजी!

Maratha Reservation: अंतरवाली सराटी लाठीमार प्रकरण; मराठा आंदोलकांवरील ३९ गुन्हे मागे, १० प्रस्ताव न्यायालयात प्रलंबित

Gangapur Accident: गंगापूर-वैजापूर रस्त्यावर भीषण अपघात! एसटी-दुचाकीची समोरासमोर धडक; शिर्डीच्या तरुणाचा जागीच मृत्यू

India vs England 5th T20 : पाचव्या टी-२० सामन्यातही भारताचा लाजिरवाणा खेळ; इंग्लंडने दिले २५८ धावांचे आव्हान, बटलर-हॅरी ब्रूकची तुफानी खेळी

SCROLL FOR NEXT