देश

बेळगावः वनखात्याने अखेर बिबट्याचा शोध थांबविला

विनायक जाधव

बेळगाव - वनखात्याने अखेर बिबट्याचा शोध थांबविला असून मागील पंधरा दिवसापासून सुरू असलेली मोहिम अखेर गुंडाळण्यात आली आहे. कुद्रेमानीत रानमांजर आणि हिंडाल्कोत दिसलेला तरस असल्याचे जाहीर करीत मोहिम थांबविली आहे. आठवडाभर बिबट्याचे दर्शन नसल्याने बिबटा जंगलात गेला असल्याचा अंदाज वर्तविला जात आहे. 

हिंडाल्कोमध्ये 8 नोव्हेंबर रोजी बिबटा दिसून आला होता. याच कालावधीत कुद्रेमाणी येथेही बिबटा दिसला. हिंडाल्कोतील सीसीटीव्हीमध्ये जरी बिबटा दिसला तरी वनखात्याने ते अमान्य करीत आपले सीसीटीव्ही याठिकाणी बसविले. ज्यात तिथे तरस दिसून आले. नंतर हुल्यानूर येथेही बिबटा दिसला. पण, तेथेही वनखात्याने तो तरस असल्याचा शिक्कामोर्तब केला. दरम्यान, याच कालावधीत कुद्रेमानी शेतात काम करणाऱ्यांना ऊसाच्या फडात बिबट्याचे दर्शन झाले. काहींनी मोबाईलवर ती चित्रफित काढून शेअर केली. त्यामुळे हिंडाल्कोमध्ये शोधमोहिम राबविताना कुद्रेमानीमध्येही बिबट्याची शोधमोहिम सुरू झाली. 

वनखात्याला बिबटा शोधण्यात अपयश आले. दोनच दिवसात पुन्हा बिबटा कुद्रेमानीत दिसून आला. याचीही चित्रफित सोशल मिडीयावर पोचली. त्यामुळे कुद्रेमानीत सहा ठिकाणी सीसीटीव्ही बसवून वनखात्याने शोध केला. त्यांच्या सीसीटीव्हीत रानमांजर दिसून आल्याने सोशल मिडीयावरील बिबट्याची चित्रफीत बाजूला ठेवत वनखात्याने कुद्रेमाणीत रानमांजराचा वापर असल्यावर शिक्का मोर्तब केले. यानंतर वनखात्याने येथील शोधमोहिम देखिल थांबविली आहे. लोकांना जरी बिबट्या दिसला तरी, वनखात्याला आपल्या सीसीटीव्हीत बिबटा दिसला नसल्याने त्यांनी बिबटा तेथे नसल्याचाच आव आणला आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nana Patole : खोके द्या, फोडा अन् राज्य करा ; पटोलेंची मोदींवर टीका,राज्याचे नुकसान केल्याचा आरोप

Prakash Ambedkar : सुळे, पाटलांमुळे बारामतीतून माघार ; डॉ. प्रकाश आंबेडकरांनी फोडले गुपित,यंदा खाते उघडणार

Water Scarcity : पिण्याच्या पाण्यासाठी दाहीदिशा वणवण ; राज्यात भीषण टंचाई,७४९५ वस्त्यांवर टँकरद्वारे पुरवठा

Latest Marathi News Live Update : PM मोदींची माढा, धाराशिवसह लातूरमध्ये सभा, तर 25 वर्षानंतर वेल्ह्यात धडाडणार शरद पवारांची तोफ

Daily Rashi Bhavishya : आजचे राशिभविष्य - 30 एप्रिल 2024

SCROLL FOR NEXT