नवी दिल्ली : वरिष्ठ भारतीय पोलिस सेवा (आयपीएस) अधिकारी दिनकर गुप्ता यांची गुरुवारी (ता. २३) राष्ट्रीय तपास संस्थेच्या (एनआयए) महासंचालकपदी नियुक्ती करण्यात आली. कार्मिक मंत्रालयाच्या आदेशात ही माहिती देण्यात आली आहे. गुप्ता हे पंजाब केडरचे १९८७ च्या बॅचचे आयपीएस अधिकारी आहे. (Former Punjab DGP Dinkar Gupta appointed as new NIA Director General)
मंत्रिमंडळाच्या नियुक्ती समितीने गुप्ता यांची एनआयएचे महासंचालक म्हणून ३१ मार्च २०२४ पर्यंत म्हणजेच त्यांच्या निवृत्तीच्या तारखेपर्यंत नियुक्तीला मान्यता दिली आहे. अन्य एका आदेशात असे सांगण्यात आले की, स्वागत दास यांची गृह मंत्रालयात विशेष सचिव (अंतर्गत सुरक्षा) म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
दास हे छत्तीसगड केडरचे १९८७ च्या बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत. सध्या ते इंटेलिजन्स ब्युरोमध्ये विशेष संचालक म्हणून कार्यरत आहेत. आदेशात म्हटले आहे की, दास यांची सेवानिवृत्तीची तारीख ३० नोव्हेंबर २०२४ पर्यंत या पदावर नियुक्ती करण्यात आली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.