देश

"ती'चा लढा- दोन्ही महिलांना पूर्ण वेळ सुरक्षा देण्याचे आदेश

वृत्तसंस्था

नवी दिल्ली : शबरीमला येथील अय्यप्पा मंदिरात प्रवेश केलेल्या कनकदुर्गा आणि बिंदू या दोन महिलांना चोवीस तास सुरक्षा पुरविण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने आज केरळ पोलिसांना दिले. 

बिंदू (वय 42) या भाकपच्या मार्क्‍सवादी-लेनिनवादी गटाच्या कार्यकर्त्या असून कनकदुर्गा (वय 44) या नागरी पुरवठा विभागात काम करतात. या दोघींनी दोन जानेवारीला मंदिरात प्रवेश करून इतिहास घडविला होता. मात्र, यानंतर त्यांना धमक्‍या येऊ लागल्याने आणि कनकदुर्गा यांना तर घरीच मारहाण झाल्याने त्यांनी संरक्षणासाठी याचिका दाखल केली होती. या याचिकेवर आज सुनावणी होऊन सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने या दोघींनी चोवीस तास सुरक्षा पुरविण्याचे आदेश केरळ पोलिसांना दिले.

तसेच, या सुनावणीदरम्यान केवळ महिलांच्या सुरक्षेबाबतच विचार करणार असून त्यांनी केलेल्या याचिकेतील इतर मागण्यांचा अथवा शबरीमला प्रकरणातील इतर याचिकांचा तूर्त विचार करणार नसल्याचे खंडपीठाने स्पष्ट केले. 

51 महिलांचा मंदिर प्रवेश? 

केरळ सरकारने भूमिका मांडताना शबरीमला मंदिरात दर्शन घेऊ इच्छिणाऱ्या सर्व महिलांना पुरेसे संरक्षण पुरविले जात असल्याचे सांगितले. तसेच, आतापर्यंत मंदिरात 51 महिलांनी दर्शन घेतल्याची माहिती सरकारने दिली. मात्र, काही याचिकाकर्त्यांतर्फे बाजू मांडणारे वकील विजय हंसारिया यांनी, आतापर्यंत एकाही महिलेने मंदिरात प्रवेश केला नसल्याचा दावा केला. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 LSG vs RR : केएल शेर तर संजू सवा शेर! राजस्थानचा एक पाय प्ले ऑफमध्ये

DC vs MI : गोलंदाजीतली 'गळती' मुंबईच्या मुळावर; बॅटिंगमध्ये फर्स्ट क्लास तर बॉलिंगमध्ये नापास

Jolly LLB 3 : आता रंगणार जॉली विरुद्ध जॉली केस; सिनेमाच्या शूटिंगबाबत महत्त्वाची अपडेट आली समोर

Google वर जाहिराती करण्यासाठी भाजपने खर्च केले 100 कोटी; BJP पहिल्या स्थानावर तर काँग्रेस कितव्या स्थानावर? वाचा सविस्तर...

CM Yogi Aadityanath : ''काशी अन् अयोध्येनंतर आता मथुरेकडे प्रस्थान...'' योगी आदित्यनाथांचे स्पष्ट संकेत

SCROLL FOR NEXT